(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood Celebrities : ऐश्वर्या-अभिषेकआधी बॉलीवूडमधील 'या' बड्या सेलिब्रेटींचा झालाय 'Grey Divorce'? जाणून घ्या सविस्तर
Bollywood Celebrities : ऐश्वर्या - अभिषेकच्या ग्रे घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच काही कलाकारांच्या नावे समोर आली आहे.
Bollywood Celebrities : बॉलीवूडमध्ये (Bollywood) सध्या एका घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु झालीये. ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक (Abhishek Bachchan) हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगू लागल्यात. अर्थात या गोष्टीसाठी अनेक घटना कारणीभूत आहेत. त्यातच अभिषेकने घटस्फोटाची संबंधित नुकतीच एक पोस्ट लाईक केली होती. अभिषेकने एका ग्रे घटस्फोटाची पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे आता ऐश्वर्या अभिषेकचा ग्रे घटस्फोट (Grey Divorce) होणार असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान 50 मध्ये होणाऱ्या घटस्फोटांना ग्रे घटस्फोट असं म्हटलं जातंय. तसाच घटस्फोट ऐश्वर्या आणि अभिषेकचा होत असल्याच्या चर्चा आहेत. पण याआधी काही बॉलीवूड कलाकारांचा ग्रे घटस्फोट झालाय. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे जर ऐश्वर्या आणि अभिषेकचा ग्रे घटस्फोट होणार असेल तर हे बॉलीवूडमधलं एकमेव जोडपं नसेल.
'या' सेलिब्रेटींचा झालाय ग्रे घटस्फोट
ग्रे घटस्फोट या यादीमध्ये आमिर खान, अरबाज खान, सोहेल खान या सेलिब्रेटींचा समावेश आहे. आमिर खान आणि किरण राव या दोघांनी 2021 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आमिरचं वय हे जवळपास 55 वर्ष इतकं होतं. अरबाज खानचा देखील समावेश आहे. अरबाज खानने बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या लग्नागाठ बांधली होती. 19 वर्षांचा संसार मोडून या दोघांनी 2017 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अरबाजचं वय हे जवळपास 50 वर्ष एवढं होतं. अरबाजसोबतच त्याचा भाऊ सोहेल खानचा देखील या यादीत समावेश आहे. सोहेल आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांनी 14 वर्षांचा संसार मोडून 2022 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचं वय हे 51 वर्ष इतकं होतं. त्यामुळे आता या यादीमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचंही नाव जोडलं जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ग्रे घटस्फोट म्हणजे काय?
आज जगभरात अशाप्रकारच्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. यामागची कारणे वेगवेगळी आहेत. ग्रे घटस्फोट म्हणजे लग्नाच्या 50 वर्षानंतर होणारा घटस्फोट. अनेकदा दीर्घकालीन संसारात राहिल्यानंतर जोडपं विभक्त होतं. ही जोडपी अनेक वर्षे किंवा दशके विवाहित असतात, पण शेवटी ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात.
ही बातमी वाचा :