Chhaya Kadam : मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॉलीवूडमध्ये आगळावेगळा प्रयोग, छाया कदम निर्मित सिनेमाचा थरारक ट्रेलर रिलीज
Chhaya Kadam : छाया कदम यांची निर्मिती असलेल्या बारदोवी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Chhaya Kadam : मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या बारदोवी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पण या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची विशेष भूमिका आहे. इतकच नव्हे तर या सिनेमासाठी अभिनेत्रीने एक महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती छाया कदमने (Chhaya Kadam) केली आहे.
"बारदोवी" या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बारदोवी" या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत.
सिनेमात हे कलाकार दिसणार?
छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत. कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमुळेच चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
छाया कदम यांचे सिनेमे
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.
View this post on Instagram