मोठी बातमी : अल्लू अर्जुनला अटक, हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई
Actor Allu Arjun Arrested : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Pushpa 2 The Rise Stampede in Hyderabad : दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
'पुष्पा 2' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद येथील चेंगराचेंगरी प्रकरणी अटक केल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनचा पुष्पा 2 चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रीमियरला अल्लू अर्जूनने हजेरी लावली. 'पुष्पा' अल्लू येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली.
हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई
मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
अभिनेता अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
View this post on Instagram
थिएटर मालकासह तिघांना अटक
अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी, चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले. या घटनेबाबत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर थिएटर मालकासह तिघांना अटक करण्यात आली.
अल्लू अर्जूनची उच्च न्यायालयात धाव
अल्लू अर्जुनने या घटनेबाबत तेलंगणा उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, ज्यामध्ये त्याने या घटनेत आपली कोणतीही चूक नसल्याचं सांगितलं. पण, त्यावेळी तो दुर्दैवाने तिथे उपस्थित होता, असंही त्याे म्हटलं होतं. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :