पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांचं रोखठोक भाष्य, म्हणाल्या, मोदी सरकार चांगलाच निर्णय घेईल पण...
Alka Kubal on Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांचं रोखठोक भाष्य, म्हणाल्या, मोदी सरकार चांगलाच निर्णय घेईल पण...

Alka Kubal on Pahalgam attack : काश्मीरमधील पहलगामध्ये आठ दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांच जीव गेला. दरम्यान, या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतं आहे. देशभरात पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला. अनेकांनी सरकारकडे जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी मागणीही केली. दरम्यान, आता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी पहिल्यांदाच पहगाम हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
मोदी सरकार चांगला निर्णय घेतील. पण अलीकडे जात धर्म जास्त झालाय. शक्तीप्रदर्शन जास्त झालेत. सगळेच मुस्लिम तसे नाहीत. काही मोजके तसे आहेत, अशी प्रतिक्रिया अलका कुबल यांनी दिली आहे.
अलका कुबल म्हणाल्या, समोरुन हल्ला झाला असेल तर आपण गप्प बसून चालणार नाही. आपलं मोदी सरकार आहे, छान निर्णय घेईल. यावर विश्वास आहे. पण मला असं वाटतंय जेवढं आपण शिकतोय. सुशिक्षित होतोय, सुसंस्कारी होतोय. तेवढचं आपण जात आणि धर्म जास्त करायला लागलो आहोत. हे खरं करता कामा नये. कुठल्या जातीचा आहे हे विचारलं, आडनाव विचारणं हे मला पटत नाही.
पुढे बोलताना अलका कबुल म्हणाल्या, आमच्या इंडस्ट्रीत असं कोणीही विचारत नाही. आम्ही नावाने हाक मारतो. कोणी सलीम असेल किंवा अजून कोणी असेल.. सगळीच माणसं अशी नसतात. सगळेच मुस्लिम असे नसतात. त्यात चांगली लोकही असतात. दोन-चार वाईट लोक असले की, हजार जणांना सामोरं जावं लागतं. हे सगळं काळानुसार बदलायला हवं. आपण एवढे वर्ष गुण्यागोविंदाने नांदत आहोत. हिंदू मुस्लीम असूद्या किंवा कोणताही जात धर्म असूद्या. आपण कधीही असं केलं नाही. आता हे जास्त व्हायला लागलं आहे. माझी जात, माझा धर्म असं खूप होत चाललं आहे. प्रत्येक जण शक्तीप्रदर्शन करु लागलाय. हा करतोय तर आम्हीही करतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या























