Hardeek Joshi : थंडा थंड कूल कूल....‘राणा दा’च्या ‘कोल्हापूर बदाम थंडाई’ला ‘पाठक बाईं’ची भेट!
Hardeek Joshi : ‘राणादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. मालिका विश्व गाजवणाऱ्या ‘राणा दा’ अर्थात हार्दिक जोशीने व्यसायात देखील पदार्पण केलं आहे.

Hardeek Joshi : प्रेक्षकांचा लाडका ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) याने व्यवसायातही पदार्पण केले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता ऑफ एअर गेली आहे. या मालिकेने गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मालिका संपली असली तरी, मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंची जोडी आजही सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी आहे. आजही प्रेक्षक या जोडीची आठवण काढतात.
‘राणादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. मालिका विश्व गाजवणाऱ्या ‘राणा दा’ अर्थात हार्दिक जोशीने व्यसायात देखील पदार्पण केलं आहे. ‘कोल्हापूर बदाम थंडाई’ हा देसी कोल्ड्रींक ब्रँड हार्दिक जोशी कोल्हापूरकरांच्या भेटीला घेऊन आला आहे. हा त्याचा स्वत:चा फूड ब्रँड आहे. ‘पाठक बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमने ‘कोल्हापूर बदाम थंडाई’च्या शाखेला भेट दिली. अक्षयाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर याचे फोटो शेअर केले आहेत.
खासबाग खाऊ गल्लीत नक्की भेट द्या!
हे खास फोटो शेअर करत हार्दिक जोशीने पोस्ट देखील लिहिली आहे. ‘कोल्हापूर येथे नव्याने सुरू केलेल्या माझ्या बदाम थंडाई या व्यवसायाच्या मुख्य शाखेला भेट दिली. या वेळी,माझ्या तुझ्यात जीव रंगला या सिरियलमधील सहकार्यांनी पण हजेरी लावली. महाराष्ट्रातील हे पहिल शॉप असेल जिथे थंडाई व लस्सी, बदाम शेक, काजू शेकचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतील व महाराष्ट्रामध्ये याच्या लवकरच आणखी काही शाखा आम्ही उघडणार आहोत. कोल्हापूरात असाल तर खासबाग खाऊ गल्लीत नक्की भेट द्या आणि आपले आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी असुद्या धन्यवाद!’, असे त्याने म्हटले आहे.
नव्या भूमिकेतून हार्दिक करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन!
अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava ) या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली, तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय.
सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे.
हेही वाचा :
- Lok Kay Mhantil : ‘8 दोन 75’नंतर सुश्रुत भागवत म्हणतायत ‘लोक काय म्हणतील?’, चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच!
- Bhuban Badyakar : ‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!
- Rohit Shetty : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या स्पर्धकाने जिंकलं रोहित शेट्टीचं मन! मिळवली आगामी चित्रपटात संगीत देण्याची संधी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
