एक्स्प्लोर

Lok Kay Mhantil : ‘8 दोन 75’नंतर सुश्रुत भागवत म्हणतायत ‘लोक काय म्हणतील?’, चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच!

Lok Kay Mhantil Marathi Movie : ‘उदाहरणार्थ निर्मित’ संस्थेच्या अंतर्गत ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी ‘चिडिया’, ‘कागर’ अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Lok Kay Mhantil Marathi Movie : ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि ‘उदाहरणार्थ निर्मित’ पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘लोक काय म्हणतील?’ (Lok Kay Mhantil) या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँच करून करण्यात आली आहे.

‘उदाहरणार्थ निर्मित’ संस्थेच्या अंतर्गत ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी ‘चिडिया’, ‘कागर’ अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच, सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा चित्रपट आहे.

‘8 दोन 75’ची हवा!

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन,  सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात सिनेमाने पुरस्कार पटकावले आहेत. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाविषयी कुतुहल

सुश्रुत यांनी ‘मुंबई टाइम’, ‘पेईंग घोस्ट’, ‘असेही एकदा व्हावे’ असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.

चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय आदी तपशील टप्प्याटप्प्यानं जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांतून सुश्रुत यांनी उत्तम विषयांची तितकीच सकस मांडणी केली असल्यानं ‘लोक काय म्हणतील?’ या चित्रपटाविषयी कुतुहल आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget