![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akshay Kumar : सोलापूरच्या मुलीसोबत अक्षयच्या खास गप्पा; परीक्षेसाठी दिल्या हटके शुभेच्छा
Akshay Kumar : अक्षयनं नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
![Akshay Kumar : सोलापूरच्या मुलीसोबत अक्षयच्या खास गप्पा; परीक्षेसाठी दिल्या हटके शुभेच्छा akshay kumar talks to a girl from solapur in marathi video viral on social media Akshay Kumar : सोलापूरच्या मुलीसोबत अक्षयच्या खास गप्पा; परीक्षेसाठी दिल्या हटके शुभेच्छा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/4ff08339fb66c04474b35a5d720110b3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बच्चन पांडे(Bachchan Pandey) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अक्षयनं नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय फोनवर एका मुलीसोबत खास गप्पा मारताना दिसत आहे. दिप्ती असं या मुलीचं नाव आहे. चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अक्षयची ही हटके पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली.
अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो सोलापूरमधील दिप्तीला फोन करतो. दिप्तीनं अक्षयला सांगितलं की ती सोलापूरची आहे. मग अक्षयनं तिच्यासोबत मराठी भाषेत बोलायला सुरूवात केली. दिप्तीनं अक्षयला सांगितलं की, ती शासकीय परीक्षेची तयारी करत आहे. हे ऐकल्यानंतर अक्षयनं दिप्लीला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि परिक्षा झाल्यानंतर बच्चन पांडे चित्रपट पाहण्यास सांगितले. दोघांमधील या संवादाचा व्हिडीओ अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अक्षयची पोस्ट-
View this post on Instagram
बच्चन पांडे हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता अरशद वारसी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)