एक्स्प्लोर

Marathi Actress :  एसी लोकलमुळे गैरसोय, मराठी अभिनेत्रीची तीव्र नाराजी; म्हणाली, 'इतक्या बेभरवशाच्या वेळेत...'

Marathi Actress : एसी लोकलमुळे बऱ्याचदा होणारा खोळंबा आणि नाहक त्रास यावर मराठी अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Marathi Actress :  दररोज लाखो लोक मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करतात. त्यामुळेच मुंबईची लाईफलाईन असलेली ही लोकल दररोज अनेकांना वेळवर ऑफिस किंवा नियोजित ठिकाणी जायला मदत करते. त्यामुळेच बऱ्याचदा गाडीने प्रवास करण्यापेक्षा लोकं लोकलने जाणं जास्त पसंत करतात. वेगवान आणि सोपा प्रवास अशी मुंबई लोकलची ओळखच आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळीदेखील (Marathi Actor) त्यांच्या शुटींगच्या वेळा गाठण्यासाठी आजही मुंबई लोकलनेच प्रवास करतात. याच मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता एसी लोकलची देखील सुविधा सुरु करण्यात आली आहे. 

पण एसी लोकलमुळे साध्या लोकलचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तर एसी लोकलचं तिकीट काढूनही साध्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीही वाया जातात. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीला आला. 36 गुणी जोडी, नवरी मिळे हिटरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अक्षता आपटेने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिने या सगळ्या प्रकरावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. 

अक्षताने पोस्टमध्ये काय म्हटलं?

अक्षताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मध्य रेल्वेवर AC trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे upgrade करून द्यावं.AC train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class च तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार.'

'यात चूक कोणाची ?'

'घाईघाईत तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतं. अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त 15/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत.असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरलाय आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला ८ नं. वरुन धावत वर जाऊन main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेलीए. या दोन्ही cases मध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती.पैसे वायाच दोन्हीकडे.यात चूक कोणाची ?' असा सवालही अक्षताने विचारला आहे. 

trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?

पुढे तिने म्हटलं की, 'वाहतूक कोंडी कमी व्हावी, प्रवासाचा वेळ वाचावा आणि थोडा आरामदायी प्रवास व्हावा म्हणून चालू केल्या आहेत ना AC ट्रेन्स? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या वेळेत आल्या तर कसं चालेल?? उलट त्या तर top priority असल्या पाहिजेत ना… काय वाटतं? आणि M-indicator सुद्धा अशावेळी नेमकं कसं माती खातं के कळत नाही!' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshata Atul Apte (@akshataapte)

ही बातमी वाचा : 

Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget