Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : 'मुंज्या' नंतर आता दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : 'मुंज्या' नंतर आता दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) आणखी एक हॉररपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची (Sonakshi Sinha) भूमिका असलेल्या ककुडा या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे. लग्नानंतर रिलीज होणारा हा सोनाक्षीचा पहिला चित्रपट आहे. रितेश सोनाक्षीसोबत साकीब सलीमदेखील या चित्रपटात झळकणार आहे.
थरकाप उडवणारा धमाकेदार ट्रेलर
काकुडाचा ट्रेलर धमाकेदार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे. आदित्यने दिग्दर्शित केलेल्या 'मुंज्या' या चित्रपटाने नुकताच 100 कोटींचा टप्पा ओलांडला. आता हा आदित्यचा हिंदीतील दुसरा हॉररपट आहे. गावाला एक श्राप लागला आहे. या गावातील प्रत्येक घराला दर मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजता आपल्या घराचा छोटा दरवाजा उघडा ठेवावा लागतो. तसे न केल्यास त्या घरातील कर्त्या पुरुषाचा 13 व्या दिवशी मृत्यू होतो. रितेशने या चित्रपटात घोस्ट हंटरची भूमिका साकारली आहे. आता, या गावाला कोणता श्राप लागलाय, रितेश देशमुख इतरांच्या मदतीने याचे कोड उलगडणार का, गावावर असलेले संकट दूर सारणार का? ककुडा कोण आहे आणि हा विधी न केल्याबद्दल शिक्षा का आहे आणि हे गाव या शापापासून मुक्त होईल का? हे या हॉरर कॉमेडीपटात पाहता येणार आहे.
View this post on Instagram
कुठे आणि कधी रिलीज होणार ककुडा?
'ककुडा'हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. 12 जुलै रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होईल आणि प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.
आदित्य-रितेशची हिट जोडी पुन्हा एकत्र
आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी माऊली या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. रितेशची मु्ख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्यने केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आदित्य सरपोतदारने मराठीत दिग्दर्शित केलेले चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले. 'नारबाची वाडी', 'उलाढाल', 'झोंबिवली', 'सतरंगी रे', 'माऊली' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.