एक्स्प्लोर

Aditi Sarangdhar : डोहाळे लागले अन् नऊ महिने नुसती बीयर प्यायले; अभिनेत्री अदिती सारंगधरने सांगितला गरोदरपणाचा किस्सा

Aditi Sarangdhar : अभिनेत्री अदिती सारंगधर हिने तिच्या गरदोरपणातला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. 

Aditi Sarangdhar : अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) ही अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कधी खलनायिकेच्या तर सोज्वळ तिच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. दरम्यान अदिती जितकं तिच्या कामाविषयी बोलत असते तितकचं ती तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. अभिनेत्री अदिती सारंगधर हिने नुकतीच तिच्या गरोदरणातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. 

अदितीने नुकतच आरपार या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने तिला गरोदरपणात बियर पिण्याचे डोहाळे लागले होता, असा खुलासा केला. तसेच तिला डॉक्टरांनी देखील बियर पिण्याचा सल्ला दिला होता, असंही अदितीने म्हटलं. सध्या सोशल मीडियावर अदितीच्या हा किस्सा बराच गाजतोय. त्यातच तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अदितीने तिच्या बाळंतपणावेळीच्या दिवसांवर भाष्य केलं होतं. त्यावेळी माझ्यासोबत कुणीच नव्हतं असंही तिनं म्हटलं होतं. 

मग मी नऊ महिने बियर प्यायचे - अदिती सारंगधर

हा किस्सा सांगताना अदितीने म्हटलं की,  माझ्या गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप उत्साहित होते. तेव्हा मला बियर प्यायचे डोहाळे लागले होते. मग मी गरोदरपणात बियर प्यायला लागले. मी तेव्हा इंडियन फूड खाल्लंच नाही. मी सॅलड खायचे आणि बियर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं की, मी काय करु बियर नाही प्यायले तर मला कसं तरी होतं. मला राग यायला लागतो. मग त्या म्हणाल्या की, घ्या दोन - दोन सीप घेत जा. मग मी नऊ महिने बियर प्यायचे. भात आणि  फोडणी वैगरे आली ना त्यातली एक एक मोहरी अशी काढून बाजूला करायचे.घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी इंडियन फूडच बंद केलं. मग मी नऊ महिने सॅलड आणि बियरच खाल्लप्यायलं होतं. 

याआधी दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलासाठी मी अभिनयातून ब्रेक घेतल्याचं तिने सांगितलं. त्यावर अदितीने म्हटलं होतं की, माझं बाळ झाल्यानंतर त्याला वेळ देता यावा यासाठी मी कामातून काही वर्ष ब्रेक घेतला होता. कारण तो मोठा होत असतानाचे क्षण मला आयुष्यातून निसटून द्यायचे नव्हते. तेव्हा त्याला जास्तीत जास्त वेळ देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. पण आता तो मोठा होतोय, त्यामुळे मीसुद्धा पुन्हा कामाला सुरुवात केलीये. पण या ब्रेकनंतरही मिळाणारी सुंदर कामं आणि प्रेक्षकांचं प्रेम ही भावना खरंच खूप सुंदर आहे. 

ही बातमी वाचा : 

Kangana Ranaut : इकडं कंगनाच्या पाठिंब्याला नकार, तर तिकडं कानशिलात लगावलेल्या महिला जवानला कामाची ऑफर; 'पंगाक्विन'वर बॉलीवूडची नाराजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget