Aditi Sarangdhar : 'गरोदरपणात काय घटाघटा बियर प्यायले नाही', ट्रोलिंगवर अदिती सारंगधरने दिलं स्पष्टीकरण
Aditi Sarangdhar : मराठी अभिनेत्री अदिती सारंगधरने ट्रोलर्सना चोख उत्तर देत स्पष्टीकरणही दिलं आहे.
![Aditi Sarangdhar : 'गरोदरपणात काय घटाघटा बियर प्यायले नाही', ट्रोलिंगवर अदिती सारंगधरने दिलं स्पष्टीकरण Aditi Sarangdhar Marathi actress answer to trollers for her statement of drinking beer in pregnancy Aditi Sarangdhar : 'गरोदरपणात काय घटाघटा बियर प्यायले नाही', ट्रोलिंगवर अदिती सारंगधरने दिलं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/8369d030613b99beeb58371e4504dfbd1719814695731720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aditi Sarangdhar : अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) मागील काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. अदितीने तिच्या गरोदरपणातील एक किस्सा सांगितला होता. त्यावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं असून तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरंही दिलं आहे. अदितीने तिच्या गरोदरपणात तिला बियर प्यायचे डोहाळे लागले होते, हा मजेशीर किस्सा सांगितला होता. त्यावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
अदिती सारंगधर ही आता बाई गं या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून अदितीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण तिने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. अदिती ही शेवटची झी मराठी वाहिनीवरील येऊ तशी कशी मी नांदायला या मालिकेत झळकली होती. त्यानंतर आता अदिती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
अदितीने ट्रोलर्सना दिलं चोख उत्तर
अदितीने इट्स मज्जा या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, 'मी काही अगदी घटाघटा बियर प्यायचे नाही. लोकांनी त्यांचं चर्वण केलं. पण काय आहे ना, ज्याला होतं त्याला ते कळतं. नाहीतर मी अजिबात ड्रींक करत नाही. म्हणजे पार्टीमधला सगळ्यात दु:खी प्राणी मी आहे. माझी 9 ची झोपायची वेळ झाली की, मी सात वाजता जेवून लिंबू पाणी पिऊन झोपणार. पण आता त्यावेळी वाटलं प्यावसं. तेव्हा मी खूप थंड पाणीही प्यायचे. इतरवेळेस गरम, कोमट पाणी पिणारी मी त्यावेळी थंड थंड पाणी प्यायचे. त्यामुळे तेव्हा बियरही प्यायचे. म्हणून मी काही पूर्ण बाटली नाही प्यायचे, एक घोट प्यायचे. पण तो वास आणि एखादा घोट मला प्यावासा वाटायचा. काय करणार मला वाटतं होतं, नाहीतर माझी चिडचिड व्हायची. ते डोहाळे होते. '
नऊ महिने मी बियर प्यायचे - अदिती सारंगधर
अदितीने आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या गरोदरपणातील किस्सा सांगितला. त्यामध्ये तिने म्हटलं की, 'माझ्या गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप उत्साहित होते. तेव्हा मला बियर प्यायचे डोहाळे लागले होते. मग मी गरोदरपणात बियर प्यायला लागले. मी तेव्हा इंडियन फूड खाल्लंच नाही. मी सॅलड खायचे आणि बियर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं की, मी काय करु बियर नाही प्यायले तर मला कसं तरी होतं. मला राग यायला लागतो. मग त्या म्हणाल्या की, घ्या दोन - दोन सीप घेत जा. मग मी नऊ महिने बियर प्यायचे. भात आणि फोडणी वैगरे आली ना त्यातली एक एक मोहरी अशी काढून बाजूला करायचे.घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी इंडियन फूडच बंद केलं. मग मी नऊ महिने सॅलड आणि बियरच खाल्लप्यायलं होतं.'
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)