Singer Monali Thakur : भर कॉन्सर्टमध्ये नको ते घडले, आक्षेपार्ह वर्तवणुकीने गायिका मोनाली ठाकूर संतापली...
Singer Monali Thakur : गायिका आणि अभिनेत्री मोनाली ठाकूरला भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तवणुकीला सामोरे जावे लागले आहे.या घटनेने संतापलेल्या मोनालीने कॉन्सर्टमध्येच थांबवली.
Monali Thakur : गायिका आणि अभिनेत्री मोनाली ठाकूरला (Monali Thakur) भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तवणुकीला सामोरे जावे लागले आहे.या घटनेने संतापलेल्या मोनालीने कॉन्सर्टमध्येच थांबवली. कॉन्सर्ट सुरू असताना एका प्रेक्षकाने मोनालीच्या प्रायव्हेट पार्टबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे मोनाली ठाकूर चांगलीच संतापली.
'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, मोनाली ठाकूर शनिवारी 29 जून रोजी भोपाळ येथील SAGE विद्यापीठात परफॉर्म करण्यासाठी आली होती. इथल्या कॉन्सर्टमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. परफॉर्मन्स सुरू असताना मोनालीने अचानक कॉन्सर्ट थांबवला. मग ती तिच्या टीमला काहीतरी बोलली आणि संतापली.
प्रायव्हेट पार्टबाबत कमेंट, मोनाली भडकली...
मोनाली ठाकूरने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवत तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्याचे सांगितले. तिने अशा प्रकारची कृती ही लैंगिक छळ असल्याचे म्हटले. काही लोक गर्दीत लपूनछपून कमेंट करतात असे तिने म्हटले. तेव्हा मोनालीने त्या व्यक्तीला सांगितले की, तू खूप लहान आहेस आणि अशा गोष्टी, वर्तवणूक कोणासोबतही करू नकोस असे तिने बजावले. मला या मुद्द्यावर आवाज उठवायचा होता आणि म्हणून आता संधी मिळाली म्हणून बोलत असल्याचेही तिने यावेळी म्हटले.
त्या व्यक्तीने काय म्हटले?
हे प्रकरण शांत झाल्यानंतर मोनालीचे कॉन्सर्ट पुन्हा सुरू झाले आणि तिने गाणे गाण्यास सुरुवात केली. दरम्यान त्या व्यक्तीने म्हटले की, मी मोनालीच्या डान्सचे कौतुक केले होते आणि त्यात आक्षेपार्ह काहीच नव्हते.
मोनाली ठाकूरची हिट गाणी
View this post on Instagram
मोनाली ठाकूर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका आहे आणि तिने अनेक हिट गाणी गायली आहेत, ज्यात 'ये मोह मोह के धागे', 'सावर लून' आणि 'जरा जरा टच मी' या गाण्यांचा समावेश आहे. त्याने अनेक सिंगिंग रिॲलिटी शोज जज केले आहेत.