Aditi Rao hydari Birthday: लहान वयातच लग्न, राजघराण्याशी संबंध, बॉलिवूडची लावण्यवती अदिती राव हैदरीच्या या खास गोष्टी माहितीत का?
अदितीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचे निर्णय घेतला होता.
Aditi Rao Hydari Birthday: आपल्या लावण्य आणि अदाकारीने पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. आज ही अभिनेत्री आपला 38 वा वाढदिवस साजरा करतेय.
आधी तिच्या उल्लेखनीय भूमिकांमध्ये गणली जाणारी बिब्बो जान ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसली. 'हीरामंडी'च्या बदनाम गल्लीमध्ये आपल्या दिलखेचक अदाकारीने, एखाद्या राजघराण्यातील स्त्रीप्रमाणे वावरणारी बिबोजान तिच्या गजगामिनी वॉकने अधिकच लक्षात राहिली. तिच्याविषयीचा कुतूहल अधिक वाढत गेलं. रॉकस्टार, दिल्ली 6, पद्मावत अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या देखण्या नटीचा खरंच राज घराण्याशी संबंध आहे. तिच्या आडनावा मागे असलेलं राव हैदरी कसा आलाय यामध्येसुद्धा एक वेगळीच कहाणी आहे.
राव -हैदरी या वेगळ्या आडनावामागे कहाणी काय?
अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिच्या आईचे नाव विद्या राव असे आहे. तर दिवंगत वडिलांचे नाव अहसान हैदरी असे आहे. विद्याराव आणि अहसान यांचा प्रेमविवाह झाला होता. अदितीच्या जन्मानंतर दोन वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर विद्या राव हैदराबाद सोडून दिल्लीला रवाना झाल्या. त्या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या थोर गायिका आहेत. आई चित्रपूर सारस्वत हिंदू आणि वडील बोहरी मुसलमान असल्यामुळे अदिती दोन्हीही धर्मांच्या शिकवण्यांचे पालन करते.
राज घराण्याशी संबंध कसा?
अदिती राव हैदरी दाक्षणात्य राजघराण्याशी संबंधित आहे. वानपर्थि घराण्याचे राजा राजा जी रामेश्वर राव यांची ती नात आहे. जे रामेश्वर राव हे ब्रिटिशांच्या काळात वणपर्थी घराण्याचे प्रमुख होते. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी हेही हैदरी घराण्याचे वंशज होते. हिरा मंडी वेब सिरीज च्या यशानंतर एका मुलाखतीत याविषयी अदितीने उलगडाही केला होता.
पहिलं लग्न 21व्या वर्षीच!
बॉलिवूडमधल्या सर्वात आधी लग्न होणाऱ्या अभिनेत्रींपैकी अदिती राव हैदरी आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिनं लग्न केलं होतं. सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं. २००९ मध्ये त्यांचं लग्न झालं पण २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. कालांतरानं सिद्धार्थ या साऊथच्या सुपरहीट अभिनेत्यासोबत ती लग्नबंधनात अडकली.
भरतनाट्यम ते बॉलीवूड पर्यंतचा प्रवास
अदितीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचे निर्णय घेतला होता. वयाच्या अकराव्या वर्षीच तिने नृत्य करण्यास सुरुवात केली. भरतनाट्यमच्या सादरीकरणासाठी अनेकदा परदेशातही तिने प्रवास केला. या दरम्यान झालेल्या ओळखी आणि मनोरंजन विश्वात अनेकांनी तिला मॉडलिंग साठी ऑफर देण्यास सुरुवात केली. मॉडलिंगच्या ऑफर नंतर दक्षणात्य चित्रपटसृष्टीतही तिने नाव कमावलं. पहिलाच चित्रपट हिट ठरल्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत दिल्ली 6 चित्रपटात ती दिसली. त्यानंतर धोबीघाट, ये साली जिंदगी, रॉकस्टार, लंडन पॅरिस न्यूयॉर्क, मर्डर थ्री, वजीर ,पद्मावत अशा कितीतरी उत्तम कलाकृतींमध्ये ती झळकली.