Adarsh Shinde : 'श्रीगणेशा' गाण्यानं होणार गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित; आदर्श शिंदेचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला आदर्श शिंदेचा भारदस्त आवाज लाभला आहे.
Adarsh Shinde : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाचा हा गणेशोत्सव अधिक चैतन्यमय आणि खास करण्यासाठी ''अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.'' घेऊन येत आहे एक भक्तिमय गाणं.
''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला आदर्श शिंदेचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर सगळीकडे सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या गाण्याला ओंकार घाडी यांनी शब्दबद्ध केले असून काशी रिचर्ड यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. ‘अल्ट्रा मीडिया ॲंड एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे सुशिलकुमार अग्रवाल निर्माता आहेत.'
गणपती हा बुद्धीचा देव आहे, विघ्नहर्ता आहे, तारणकर्ता आहे. त्याची मनोभावे आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जातो. त्यात 'श्रीगणेशा' या गाण्याने हा उत्साह द्विगुणित होणार आहे.
पाहा गाणं:
View this post on Instagram
आदर्श शिंदेच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
आदर्श शिंदेनं मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये 1500 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. देवा तुझ्या गाभाऱ्याला ,मोरया मोरया, ओ काका, नाद करा या आदर्शच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच आदर्शनं बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी देखील गायली आहेत. सम्राट पृथ्वीराज तसेच तान्हजी यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील गाणी आदर्शनं गायली आहेत. आदर्श हा गाण्यांच्या कार्यक्रमाचे परीक्षण देखील करतो.
वाचा इतर महत्त्वाची बातमी: