प्रेग्नंट असताना टाईट कपडे घालायला लावले, अभिनेत्री राधिका आपटेचे खळबळजनक आरोप
Actress Radhika Apte : प्रेग्नंट असतानाही टाईट कपडे घालायला लावले, अभिनेत्री राधिका आपटेचे खळबळजनक आरोप

Actress Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिला तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांकडून नेहमी भरभरुन प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो. ओटीटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधिका आपटे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाहीत. मात्र अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या गर्भधारणेदरम्यानचे अनुभव शेअर केले, जे थक्क करणारे होते. अभिनेत्री राधिका आपटे हिने निर्मात्यांवर काही गंभीर आरोप देखील केले आहेत. राधिका नेमकं काय काय म्हणाली? जाणून घेऊयात..
इंडस्ट्रीमधील वागणुकीवर राधिका आपटे यांचे मत
राधिका आपटे गेल्या वर्षी आई झाली, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अलीकडेच राधिका नेहा धुपियाच्या ‘Freedom To Feed’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये त्यांनी गर्भधारणेदरम्यान चित्रपटसृष्टीत मिळालेल्या वागणुकीबाबत मोकळेपणाने संवाद साधला. राधिका आपटेने सांगितले की, आजही बॉलीवूडमध्ये गरोदर महिलांकडे जुनाट दृष्टिकोनातून पाहिले जाते.
View this post on Instagram
'माझ्या प्रेग्नन्सीच्या बातमीने प्रोड्यूसर नाराज झाला होता'
राधिकाने शोमध्ये सांगितले, “जेव्हा मी माझ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली, तेव्हा मी ज्या भारतीय निर्मात्यासोबत काम करत होते, त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्याचे वागणे माझ्याबाबतीत कठोर आणि असंवेदनशील झाले होते.” पुढे राधिकाने सांगितले की त्या काळात तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
'निर्मात्याने जबरदस्तीने टाईट कपडे घालायला लावले'
राधिका आपटे म्हणाली, “मी गर्भधारणेच्या पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये होते. मला वारंवार भूक लागत होती आणि मी भात, पास्ता वगैरे खात होते. शरीरात अनेक बदल घडत होते. अशा काळात समजूतदारपणा आणि पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा होती, पण त्या निर्मात्याचे वर्तन अत्यंत वाईट होते. त्यांनी मला जबरदस्तीने टाईट कपडे घालायला लावले, जे माझ्यासाठी खूपच अस्वस्थ करणारे होते.”
मानसिकतेत बदल होणे गरजेचे
राधिकाने हेही सांगितले की, आजही चित्रपटसृष्टीत अनेक ठिकाणी महिलांची प्रेग्नन्सी ही कमजोरी म्हणून पाहिली जाते, जे मानसिकतेत बदल होण्याची गरज दर्शवते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, फिल्म इंडस्ट्री महिलांबाबत विशेषतः आई होऊ घातलेल्या अभिनेत्रींबाबत संवेदनशील आणि समजूतदार दृष्टीकोन कधी स्वीकारणार?
इतर महत्त्वाच्या बातम्या























