(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सहगल यांना गूगल डूडलद्वारे आदरांजली
सहगलचा यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपूर येथे झाला होता. त्यांनी जर्मनीच्या ड्रेस्डेनमधील सर्वोत्कृष्ट शाळेत बॅले नृत्याचं प्रशिक्षण घेतलं.
मुंबई : गूगल डूडलवर मंगळवारी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सहगल या दिसल्या. गूगलवर जोहरा सहगलला यांचं स्मरण करण्याचं कारणही खूप खास आहे. देशातील पद्मश्री, पद्मविभूषण आणि कालिदास सन्मान अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी जोहरा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सहगलचा यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपूर येथे झाला होता. त्यांनी जर्मनीच्या ड्रेस्डेनमधील सर्वोत्कृष्ट शाळेत बॅले नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. 1945 मध्ये सहगल इंडियन पीपल थिएटर असोसिएशनमध्ये दाखल झाल्या आणि त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये नीचा नगरसारखे सिनेमे आहेत. 1946 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आजच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोच्च अशा Palme d’Or prize पुरस्काराने या सिनेमाला सन्मानित करण्यात आला.
1962 मध्ये जेव्हा सहगल लंडनमध्ये राहत होत्या तेव्हा त्या ‘डॉक्टर हू’ या ब्रिटिश टीव्ही शोमध्ये काम करत होत्या. या व्यतिरिक्त जोहरा 1984 मध्ये मिनी सीरिज The Jewel in the Crown मध्येही दिसल्या होत्या. जोहरा सहगल 'बेंड इट लाइक बेकहम'मध्येही झळकल्या होत्या. 10 जुलै 2014 रोजी जोहरा यांनी या जगाला निरोप घेतला. त्यांच्या शेवटच्या काळात जोहरा दिल्लीत होत्या. आज डूडलवर दिसणारे हे चित्र गाईड आर्टिस्ट पार्वती पिल्ले यांनी तयार केले आहे.
जोहरा सहगल यांनी 'सांवरिया', 'कल हो ना हो', 'वीर-झारा', 'चलो इश्क लड़ाएं', 'हम दिल दे चुके सनम', 'कभी खुशी कभी गम' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. सेहगल यांच्या कामाची दखल घेत 1998 साली पद्मश्री पुरस्कार, 2001 साली कालिदास सन्मान, 2010 साली तर त्यांना पद्म विभूषण सारख्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.