एक्स्प्लोर

Abhishek Bachchan Broke Silence On Divorce: ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चननं मौन सोडलंच...; एका शब्दातच सांगितलं नात्यातलं सत्य

Abhishek Bachchan Broke Silence On Divorce: अभिषेक बच्चननं अखेर ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं असून त्यानं एका शब्दातच त्यांच्या नातातलं सत्य सांगितलं आहे.

Abhishek Bachchan Broke Silence On Divorce Rumors With Wife Aishwarya Rai: बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार कपल्सपैकी (Bollywood Star Couple) एक असलेलं, पॉवरफुल कपल म्हणजे, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan). पण, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपलमध्ये फारसं काही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. एवढंच नाहीतर, दोघंही लवकरच घटस्फोट (Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumors) घेणार असल्याचंही बोललं जात होतं. गेल्या बऱ्याच काळापासून अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे कमी आणि पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत होते. पण, असं असूनही दोघेही याबाबत कधीचा काहीच बोलले नाहीत. एकीकडे दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड होत होत्या. तर, दुसरीकडे हे जोडपं काहीही न बोलता सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन या अफवा खोट्या असल्याचं वारंवार सांगत होते.  

अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला 

बऱ्याच काळ सुरू असलेल्या घटस्फोटाच्या अफवा ऐकून अभिषेक बच्चन हैराण झाला आहे. अलिकडेच, ई टाईम्सशी बोलताना, अभिषेक बच्चननं त्याच्या नुकत्याच आलेल्या 'कालिधर लापता' सिनेमाबाबत बोलताना घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन म्हणाला की, तो बहुतेकदा त्याच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करतो, पण आता ही बाब त्याच्यासाठी अत्यंत चिंतादायक ठरतेय. कारण, जेव्हा तुम्ही बराच काळ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो.  

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya♥️Abhishek BACHCHAN (@aish.abhifc)

अशा अफवा खूप वेदनादायी असतात : अभिषेक बच्चन 

अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, "अशा अफवा तुम्हाला खूप त्रास देतात. तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तरीही तुम्ही एका कम्प्युटरच्या मागे बसून एखाद्यासाठी काहीही वाईट लिहिणं योग्य नाही, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. अफवा लहान असो वा मोठी, त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. अभिनेता म्हणतो की, अशा बातम्यांचा फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला आहे." तसेच, पुढे बोलताना अभिषेक बच्चननं प्रश्न विचारला आहे. अभिषेक म्हणतो की, जर कोणी तुमच्यासोबत असं केलं तर तुम्हाला कसं वाटेल? 

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya♥️Abhishek BACHCHAN (@aish.abhifc)

17 वर्षांपासून एकमेकांसोबत... : अभिषेक बच्चन 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायला बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक बच्चननं ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं आणि 2011 मध्ये आराध्या बच्चनचा जन्म झाला. त्यांच्या लग्नाला 17 वर्ष झालीत आणि आजही हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वात शक्तीशाली जोडपं म्हणून ओळखलं जातं. 

दरम्यान, लग्नापूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेत. दोघांचा 'गुरु' हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. याशिवाय 'ढाई अखर प्रेम के', 'धूम 2', 'कुछ ना कहो' अशा अनेक चित्रपटांमध्ये या जोडप्यानं धमाल केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Television Actress Struggle Life: ऐश्वर्या, दीपिका, आलिया, करिना; 'या' टेलिव्हिजन स्टारनं नेटवर्थमध्ये सगळ्यांना टाकलं मागे, आज सांभाळतेय 1200 कोटींचं साम्राज्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
Amit Thackeray: पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
Embed widget