Television Actress Struggle Life: ऐश्वर्या, दीपिका, आलिया, करिना; 'या' टेलिव्हिजन स्टारनं नेटवर्थमध्ये सगळ्यांना टाकलं मागे, आज सांभाळतेय 1200 कोटींचं साम्राज्य
Television Actress Struggle Life: टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांनी अभिनयात खूप यश मिळवलं. पण नंतर ते अचानक ग्लॅमरस जगातून दूर झाले. पण त्यांच्यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे.

Television Actress Struggle Life: आपल्या अभिनयानं रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक टेलिव्हिजन अभिनेत्री (Television Actress), पण आज कमाईच्या बाबतीत तिनं बॉलिवूडच्या (Bollywood Actress) बड्या अभिनेत्री दीपिका (Deepika Padukon), आलिया (Alia Bhatt), करिना (Kareena Kapoor), अनुष्का आणि अशा कित्येक जणींना मागे टाकलं आहे. तिचं नेटवर्थ थोडंथोडकं नाहीतर, तब्बल 1200 कोटींचं आहे.
आज आम्ही तुम्हाला टीव्ही जगतातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिनं एकेकाळी आपल्या अभिनयानं लोकांच्या मनावर राज्य केलं. पण आज ती मेकअपच्या वस्तू विकून कोट्यवधींची मालकीण बनली आहे.
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांनी अभिनयात खूप यश मिळवलं. पण नंतर ते अचानक ग्लॅमरस जगातून दूर झाले. पण त्यांच्यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे. जी अचानक छोट्या पडद्यावरुन गायब झाली. तिचे चाहतेही बराच काळ चिंतेत होते. पण, तेवढ्यात ती एक बिझनेसवुमन बनून समोर आली. आज ती मेकअप प्रोडक्ट्स विकून कोट्यवधींची कमाई करत आहे. बरं तिचं नेटवर्थ थोडं थोडंकं नाहीतरी चक्क एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला गाजवणारं आहे. आलिया, दीपिका, ऐश्वर्या, करिना... किंवा आणखी कुणी अजिबात तिच्या आसपासही नाहीत. भल्याभल्या अभिनेत्रींना तिनं नेटवर्थमध्ये मागे टाकलं आहे.
View this post on Instagram
Renee Cosmetics ची मालकीण, आशका गोराडिया
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव आशका गोराडिया (Aashka Goradia). तिनं काही वर्षांपूर्वी अभिनयातून ब्रेक घेतला आणि त्यानंतर व्यवसायात पाऊल ठेवलं. आज तिच्या मेहनतीला इतकं फळ मिळालं आहे की, ती तब्बल 1200 ते 1300 कोटींच्या ब्युटी ब्रँडची मालकीण (Beauty Brand Owner) बनली आहे. आशकाच्या ब्युटी ब्रँडचं नाव रेनी कॉस्मेटिक्स (Renee Cosmetics) आहे. हा केवळ सर्वसामान्य तरुणींचाच नाहीतर अनेक सेलिब्रिटींचाही आवडा ब्रँड बनला आहे.
आशकानं कधी सुरू केलेला मेकअप ब्रँड?
आशकाला 2018 मध्ये व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिनं तिच्या दोन मैत्रिणींसोबत Renee कॉस्मेटिक्स सुरू केलं. दरम्यान, हा ब्रँड 2020 मध्ये लाँच झाला. यामध्ये, अभिनेत्रीनं लिपस्टिक, आयलायनर, 3डी आयलॅशेस आणि स्पेशल 5-इन-1 लिपस्टिक फॅब 5 सारखे ब्युटी प्रोडक्ट्स विकण्यास सुरुवात केली. सर्वांना हे ब्युटी प्रोडक्ट्स आणि त्यांची क्वॉलिटी आवडली आणि बघता बघता आशकाचा ब्रँड 1200 कोटींवर जाऊन पोहोचला.
View this post on Instagram
आशका गोराडियाची एकूण संपत्ती किती?
आशकाच्या ब्रँडनं तिला अल्पावधीतच मोठा नफा मिळवून दिला. न्यूज 18 नं दिलेल्या वृत्तानुसार, 2022 पर्यंत रेनीचं मूल्यांकन 834 कोटी रुपये होतं, पण आता म्हणजेच, 2025 पर्यंत ते 1200-1300 कोटी रुपयांवर पोहोचलं. त्यानुसार, आज आशका गोराडियानं बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोण यांना नेट वर्थमध्ये खूप मागे टाकलं आहे. ही अभिनेत्री आता सुमारे 1200 कोटींची मालकीण बनली आहे. आशकानं तिच्या कारकिर्दीत 'कुसुम', 'सिंदूर तेरे नाम का', 'लागी तुझसे लगन', 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' आणि 'नागिन 2' यासह अनेक हिट शो दिले आहेत. सध्या ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
आलिया-दीपिकाचं नेटवर्थ किती?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि कपूर कुटुंबाची लाडकी सून आलिया भट्ट आज स्वतःहून कोट्यवधींची मालकीण बनली आहे. एनडीटीव्हीनुसार, आलिया सुमारे 517 कोटींची मालकीण आहे. दीपिका पदुकोण तिच्या मुलीच्या जन्मापासून रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, दीपिकाची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटी आहे.
ऐश्वर्या राय किती कोटींची मालकीण?
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिनं तिच्या कामातून कोट्यवधींची कमाई केली. तिचं नाव बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. एनडीटीव्हीनुसार, अभिनेत्रीचं नेटवर्थ 862 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























