एक्स्प्लोर

Abhishek Bachchan On Divorce Rumours: ऐश्वर्यासोबत लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला अभिषेक बच्चन; म्हणाला...

Abhishek Bachchan On Divorce Rumours: अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

Abhishek Bachchan On Divorce Rumours: बॉलिवूडचं (Bollywood News) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या (Abhishek Aishwarya Divorce Rumors) अफवांनी काही दिवसांपूर्वी इंटरनेट हादरलं होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या जिथे कुठे स्पॉट होतील, दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन त्यांच्या नात्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच, त्या दरम्यान अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाल्यामुळे संभ्रमही वाढला होता. दोघांमध्ये नेमकं काय सुरूये? दोघांमध्ये सर्वकाही ठीक तर आहे ना? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकपैकी कुणीच यावर जाहीरपणे बोललं नाही. दरम्यान, अभिषेक बच्चननं आता मात्र या विषयावर मौन सोडलं आहे. नुकत्याच ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला की, सातत्यानं पसरवल्या जाणाऱ्या अशा खोट्या बातम्यांचा त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर वाईट परिणाम झाला.

अभिषेक बच्चन म्हणाला की, "यापूर्वी, माझ्याबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या, त्याचा माझ्यावर कधीच, कसलाही परिणाम झाला नाही. आज माझं एक कुटुंब आहे आणि आज अनेक गोष्टी पसरवल्या जातात, हे अत्यंत त्रासदायक आहे. जरी मी एखाद्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं, तरी लोक त्याचा उलटाच अर्थ घेणार. कारण निगेटिव्ह गोष्टीच विकल्या जातात. तुम्ही म्हणजे मी नाही... तुम्ही माझं आयुष्य जगत नाही... मी ज्यांना उत्तरदायी आहे, त्यांना तुम्ही उत्तरदायी नाही...."

पुढे बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, "अशी नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांना त्यांच्या अंतरात्मासोबत जगाव लागेल. त्यांना त्यांच्या अंतरात्माशी जुळवून घ्याव लागेल आणि त्यांच्या निर्मात्याला उत्तर द्याव लागेल. पहा, ह फक्त मी नाही. माझ्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. मला माहत आहे की, या ठिकाणी काय चूक आहे, त्यात कुटुंब देखील सामील आहेत. मी तुम्हाला ट्रोलिंगच्या या नव्या ट्रेंडच एक चांगल उदाहरण देतो."

अभिषेक बच्चननं पुढे बोलताना एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये एका ट्रोलरनं त्याच्या पोस्टवर अत्यंत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. यावर त्याचा मित्र सिकंदर खेर खूप नाराज झाला आणि त्यानं पब्लिकली आपला पत्ता पोस्ट केला आणि ट्रोलरा त्याच्या समोर येऊन ही गोष्टी बोलायला आव्हान दिलं. अभिनेता म्हणाला की, "कंप्यूटर स्क्रीनच्या मागे गुप्तपणे बसणं आणि सर्वात वाईट, आक्षेपार्ह्य गोष्टी लिहिणं खूप सोपं आहे. तुम्हाला कळतं तरी का? तुमच्यामुळे एखाद्याला खरंच दुःख होत असेल. जर तुमच्यासोबत असं कुणी केलं तर कसं वाटेल?"

ऑनलाईन ट्रोल करणाऱ्यांना पब्लिकली आव्हान देत अभिषेक म्हणाला की, "जर तुम्हाला इंटरनेटवर काही म्हणायचं असेल, तर मी तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही माझ्या समोर येऊन मला सांगा. त्या व्यक्तीमध्ये कधीच माझ्यासमोर येऊन हे सांगण्याची अजिबात हिंमत नसेल. जर कुणीही माझ्या समोर येऊन काहीही म्हटलं तर, मला वाटेल की, त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आहे. मी त्या व्यक्तीला नक्कीच सामना करेल."

दरम्यान, अभिषेक बच्चन लवकरच मधुमिता दिग्दर्शिक कालीधर लापतामध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये दैविक भागेला आणि जीशान अयुबही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून आले आहेत. ही फिल्म झी5 वर 4 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Who Is Imtiaz Ali First Choice For Rockstar: रणबीर कपूर नाही, तर रॉकस्टारसाठी 'हा' अभिनेता होता पहिली पसंत; दिग्दर्शकानं कारणंही सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget