Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धचा पुन्हा जळफळाट होणार! गाण्याच्या निमित्ताने आशुतोष-अरुंधती एकत्र येणार!
Aai Kuthe Kay Karte : एकीकडे अरुंधती यश मिळवत आहे, तर दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध यांच्यात काद्याक्याची भांडणं सुरु आहेत.
Aai Kuthe Kay Karte : आपल्या दमदार गाण्यांनी ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधती आता करिअरमध्ये एक खास टप्पा गाठते आहे. रांधा, वाढा आणि उष्टी काढा अशा संसारातून बाहेर पडून, अरुंधती आता स्वतःच वेगळं विश्व निर्माण करतेय. मालिकेतील अरुंधतीकडू अनेक महिलांना प्रेरणा मिळते आहे. अनेकींनी आपल्या पायावर उभं राहण्यास आणि स्वावलंबी होण्यास सुरुवात केली आहे. आता अरुंधती लवकरच एका नव्या टप्प्यावर पोहचणार आहे.
एकीकडे अरुंधती यश मिळवत आहे, तर दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध यांच्यात काद्याक्याची भांडणं सुरु आहेत. आता अरुंधती चार पैसे कमवू लागली आहे, तर संजना आणि अनिरुद्ध बेरोजगार होऊन घरात बसले आहेत. त्यातच अरुंधतीचं यश आणि तिची आशुतोषशी जवळीक पाहून अनिरुद्धचा जळफळाट होतो आहे. आता त्याचा हाच जळफळाट आणखी वाढणार आहे. कारण अरुंधती आणि आशुतोष पहिल्यांदाच एकत्र गाणं रेकॉर्ड करणार आहेत.
अरुंधतीला मिळणार नव्या चित्रपटात गाण्याची ऑफर!
‘सुखाचे चांदणे’ रिलीज झाल्यानंतर नुकतंच अरुंधतीने संगीतकार निलेश मोहरीर यांच्यासाठी एक चित्रपट गीत रेकॉर्ड केलं. या गाण्यानंतर आता अरुंधतीकडे नव्या गाण्यांची रीघ लागली आहे. एका अशाच दिग्दर्शकाने अरुंधती आणि आशुतोष यांना एकत्र भेटायला बोलावले आहे. यावेळी ते अरुंधतीला दोन नवी गाणी ऑफर करणार आहेत. आगामी मराठी चित्रपटासाठी ही गाणी असणार आहेत. यातील एक गाणे एकटी अरुंधती गाणार आहे. तर, दुसरे गाणे अरुंधती आणि अनिरुद्ध मिळून गाणार आहेत.
अनिरुद्ध पुन्हा एकदा घटस्फोट घेणार?
अरुंधती यशाची वाट चालत असताना, अनिरुद्ध मात्र पुन्हा एकदा दुःखाच्या गर्तेत लोटला जाणार आहे. सजना आणि अनिरुद्धमध्ये कडाक्याचे वाद सुरु असून, आता अनिरुद्ध पुन्हा एकदा घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे. संजनाने घरच्यांना फसवून घर नावावर करून घेतल्याचे कळताच अनिरुद्ध संतापला आहे. त्याने रागाच्या भरात, घटस्फोट देईन, अशी धमकी संजनाला दिली होती. या धमकीला घाबरून तिने घर तर परत केलं. मात्र, अनिरुद्ध त्याच्या निर्णयावर ठाम राहीला आहे. तो सतत संजनाला घटस्फोट देण्याची धमकी देत आहे. याच धमकीच्या दबावाखाली आता संजनाने टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वतःला इजा करून ती सगळा दोष देशमुख कुटुंबावर टाकणार आहे.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...