(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sneha Dubey: सासऱ्यांवर गोळीबार, वडिलांचा संघर्ष, आता हितेंद्र ठाकूर हद्दपार, वसईत झेंडा रोवणाऱ्या स्नेहा दुबे कोण?
BJP Sneha Dubey-Pandit: हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या स्नेहा दुबे-पंडित कोण आहेत, जाणून घ्या....
Who is Sneha Dubey-Pandit Vasai Hitendra Thakur: वसई विरारमध्ये गेली 35 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना या निवडणूकीत जबरी पराभवाला सामोरे जावं लागलं. त्याच्या तिन्ही विद्यमान सीट भाजपा आणि शिवसेनेने जिंकून बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार लावली आहे. वसईच्या परिवर्तनासाठी आणि विकासासाठी जनतेने कौल दिल्याचं नालासोपारा आणि भाजपाच्या उमेदवारांनी सांगितलं आहे. कधीही न हरणारे हितेंद्र ठाकूरांना एका नवख्या महिला भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांनी अवघ्या 3200 मतांनी हरवलं.
वसई विरारमध्ये गेली 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. सहा वेळा माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे वसई विधानसभेवर निवडून आले होते. तर सलग तीन वेळा हितेंद्र ठाकूरांचे पुत्र क्षितिज ठाकूर ही नालासोपारा मतदारासंघातून निवडून आले होते. यंदाच्या निवडणूकीत माञ भाजपाने दोन्ही मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडून खेचून घेवून विजयश्री संपादन केली. कधीही न हरणारे हितेंद्र ठाकूरांना एका नवख्या महिलेनं अवघ्या 3200 मतांनी हरवलं. 2009 ला हितेंद्र ठाकूरांनी निवडणूक लढवली नव्हती त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले विवेक पंडित यांनी बहुजन विकास आघाडीचे नारायण मानकर यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 आणि 2019 ला हितेंद्र ठाकूर हे स्वतः उभे रहिले आणि भरघोस मतांनी जिकूंन आले. यंदा ही बहुजन विकास आघाडीचेच वारे वाहत होते. मात्र यात जॉंईट किलर ठरल्या त्या स्नेहा दुबे-पंडीत (Sneha Dube-Pandit) त्यांनी कधी न हारणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा पराभव केला आणि एक इतिहासच घडवला.
सासऱ्यांवर 35 वर्षांपूर्वी गोळीबार
विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर स्नेहा दुबे-पंडित यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. स्नेहा दुबे या विवेक पंडीत यांची मुलगी, आणि सुरेश दुबे यांची सून आहे. ज्येष्ठ पत्रकार युवारज मोहिते यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत स्नेहा दुबे यांचं कौतुक केलं आहे. तसेच स्नेहा दुबे यांच्या सासऱ्यांवर गोळीबार झाला होता, या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर होते...याची एक आठवण देखील युवराज मोहिती यांनी पोस्टद्वारे करुन दिली. स्नेहा दुबे यांचे सासरे सुरेश दुबे यांच्यावर 35 वर्षांपूर्वी नालासोपारा स्टेशनवर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. सुरेश दुबे यांच्याकडे मोक्याचा एक भूखंड होता. भाई ठाकूरची नजर त्यावर पडली. भाईने सुरेशना विरारला बोलावलं. हा भूखंड मला हवाय, असं दरडावलं. नकार देत सुरेश तिथून कसेबसे निघाले. मग धमक्यांचं सत्र सुरू झालं. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. धोका लक्षात घेवून मग कुटुंबियांनी सुरेश यांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला. अनेक दिवस कुटुंबियांच्या गराड्यातच ते राहिले. एके दिवशी दुबेंकडे एक नातेवाईक आले होते. अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले सुरेश त्यांच्यासोबत पार्ल्यात निघाले. नालासोपारा स्टेंशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहात असताना तिथे शस्त्र घेवून मारेकरी आले आणि धडाधड सुरेश दुबे यांच्यावर गोळीबार झाला. हे सगळं प्रकरण वसईतील नागरिक, सजक लोक, श्रमजिवी संघटने मार्फत विवेक पंडीत यांनी लावून धरलं होतं. आंदोलनं सुरू होती. याच काळात भाई ठाकूरचा भाऊ हिंतेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाला. त्याला कुणीच हरवू शकत नव्हतं. आता स्नेहा पंडीत - दुबे या नवख्या उमेदवाराने हितेंद्र ठाकूर यांचा वसईत पराभव केलाय, असं युवराज मोहिते यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
कोण आहे स्नेहा दुबे-पंडीत? ( Who Is Sneha Dube-Pandit )
जन्म आणि पार्श्वभूमी-
स्नेहा दुबे पंडीत यांचा जन्म 1985 साली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसई या ऐतिहासिक नगरीत झाला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या आहेत. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले आणि त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले.
शैक्षणिक पात्रता-
स्नेहा दुबे यांचं उच्च शिक्षण घेत वकिलीची पदवी (एलएलबी) मिळवली. त्या न्यायाधीश पॅनेलच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
महिला सक्षमीकरण
वाडा आणि विक्रमगड सारख्या दुर्गम भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी 300 बचत गट स्थापन केले आणि तब्बल 3000 महिलांना रोजगार निर्माण करून दिला. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 70 पेक्षा जास्त महिला सरपंचांना प्रशिक्षण देऊन सक्षम नेतृत्व तयार केले. “आई सन्मान” मोहिमेतून स्वतःच्या मुलांच्या नावापुढे आईचे नाव नोंदवले आणि राज्यभरात हा विचार रुजवला. या मोहिमेला सरकारनेही मान्यता दिली.
कुपोषण निर्मूलन-
जव्हार आणि मोखाडा या भागांमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी “अमृत आहार योजना” राबवून बालकांचा मृत्यूदर कमी केला. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्यांनी 3 लाख झाडांची लागवड केली.
राजकीय प्रवास-
2017 साली श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदाचा भार सांभाळल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत 2024 साली भारतीय जनता पक्षाने वसई विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. तब्बल 44 वर्षांनंतर वसईमध्ये महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.