एक्स्प्लोर

West Bengal Election Result 2026 Amit Shah: पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालच्या निवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या हिंदुत्त्वाच्या राजकारणाला मोठं यश, बंगालची सत्ता ममता बॅनर्जींच्या हातातून जाणार

West Bengal Election Result 2026: जवळपास संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना विरोधातील एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाजपला आजपर्यंत शरण न गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची दाट चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्षे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार होते. देशातील अनेक राज्यं भाजपच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकवून ठेवला होता. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता याठिकाणी भाजपची (BJP) सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार, भाजपने 157 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल अवघ्या 115 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता येणार आहे. हे भाजपसाठी ऐतिहासिक यश मानले जात आहे. (West Bengal Election Result)

यापूर्वी 2016 आणि 2021 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये तितक्याच इर्ष्येने लढून ममता बॅनर्जी यांनी भाजपची डाळ शिजू दिली नव्हती. मात्र, यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच, असा चंग बांधला होता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित शाह हे पश्चिम बंगालमध्ये स्वत: सूत्रं हलवत होते. पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार आणि मतदान या काळात अमित शाह (Amit Shah) हे अक्षरश: पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचे भाकीत केले होते.

पश्चिम बंगालमध्ये 24 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते, तेव्हा अमित शाह यांनी भाजप 152 जागांपैकी 110 जागी विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला होता. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 170 जागांवर विजय मिळेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. अमित शाह यांच्या तोंडातून बाहेर पडलेले हे वाक्य तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये उतरवली होती. या निवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल दोन लाख सीआरपीएफ जवान आणि कडेकोट बंदोबस्त पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आला होता. तसेच या निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीमेतंर्गत जवळपास 90 लाख मतदारांची नावे निवडणूक यादीतून काढून टाकली होती. ही गोष्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका, टीएमसी 100 च्या खाली, भाजप 150 जागांवर आघाडीवर

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget