एक्स्प्लोर

नागपुरातील 2 जागा वादाचा केंद्रबिंदू! काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवण्यावर ठाम; महाविकास आघाडी तोडगा कसा काढणार?

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे. मात्र नागपूरच्या दोन जागांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दावा सांगितला आहे.

नागपूर : राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटपाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करून सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. असे असतानाच विदर्भातील दोन जागांवर शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष अडून बसलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नागपुरातील (Nagpur) दोन मतदारसंघ जागावाटपाच्या मतभेदाच केंद्रबिंदू ठरत आहेत. 

नागपुरात नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील जागावाटपात दक्षिण नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ या दोन जागांवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. नागपूर शहरातील सहापैकी एक आणि ग्रामीण भागातील सहापैकी एक अशा दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हव्या आहेत. रामटेक या मतदारसंघातून शिवसेना पक्ष निवडणूक लढलेला आहे. त्यामुळे यावेळीदेखील या जागेवरून आम्हीच निवडणूक लढवणार असा दावा ठाकरे यांच्या पक्षाने केली आहे. 

दोन्ही जागांवर काँग्रेसचाही दावा

तसेच नागपूर शहरातील दक्षिण नागपूर ही जागाही काँग्रेसने आमच्यासाठी सोडावी अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. तर दुसरीकडे दक्षिण नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा आतापर्यंत काँग्रेसच लढत आलेली आहे. त्यामुळे या जागेवरून आम्हीच निवडणूक लडवणार, अशी भूमिका येथील काँग्रेसने घेतली आहे. 

काँग्रेसचाही दोन्ही जागांवर दावा

दक्षिण नागपूर या मतदारसंगात काँग्रेसकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. या मतदारसंगात काँग्रेसकडून अनेक इच्छुकांनी दोन-तीन आधीपासून तयारी सुरू केलेली आहे. तर रामटेकमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक नेते इच्छुक आहेत. परिणामी हे दोन्ही पक्ष या जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपातील मतभेदाचे केंद्रबिंदू नागपुरातील हे दोन मतदारसंघ असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठी या दोन्ही जगांवर नेमका काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

हेही वाचा :

मोठी बातमी! महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण, आता फक्त मोजक्याच जागांचा प्रश्न; अमित शाहांच्या उपस्थितीत तिढा सुटला?

Maharashtra Assembly Elections 2024 : अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Embed widget