एक्स्प्लोर

वरोरा विधानसभा क्षेत्र | बदललेल्या समीकरणांमुळे देवतळे चुलत भावांमधला संघर्ष पाहायला मिळणार?

सगळ्या बदललेल्या परिस्थितीत मतदार, कार्यकर्ते आणि नेते यांची पुनर्मांडणी होणार आहे. त्यामुळेच वरोरा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वांसाठीच 'अपेक्षित प्रश्न' माहित नसलेला पेपर ठरणार आहे.

बाबा आमटे यांचं आनंदवन अशी जगात ख्याती असलेल्या वरोरा विधानसभा मतदारसंघात यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक अनाकलनीय निवडणूक होण्याची चिन्हं आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर मतदारसंघातील राजकारणात इतके बदल झाले आहेत की निवडणुकीचा एक पूर्ण नवीन सारीपाट इथे मांडला जाणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये गेले असून ते आता खासदार झाले आहे. गेल्या निवडणुकीत अतिशय प्रबळ असलेले मनसे आणि बसपासारखे पक्ष आता कमकुवत झाले आहेत. आतापर्यंत लहान भावाच्या भूमिकेत असलेली भाजप मतदारसंघावर हक्क सांगणार आहे. या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत मतदार, कार्यकर्ते आणि नेते यांची  पुनर्मांडणी होणार आहे. त्यामुळेच वरोरा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वांसाठीच 'अपेक्षित प्रश्न' माहित नसलेला पेपर ठरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून विळ्या-भोपळ्याचे संबंध आहे आणि त्याला मुख्यत्वे या मतदारसंघातील राजकारण कारणीभूत ठरले आहे. जिल्ह्यात चंद्रपूर लोकसभा भाजपकडे तर वरोरा विधानसभा शिवसेनेकडे असं सूत्र ठरलं होतं. मात्र भाजप खासदार हंसराज अहिर हे विधानसभेत शिवसेनेला सुरुंग लावणार आणि शिवसेना लोकसभेत याचं उट्ट काढणार हे अगदी ठरलेलं समीकरण. अहिर विरुध्द धानोरकर या संघर्षामुळे इथे विधानसभेत काँग्रेस सातत्याने जिंकत राहिली आणि काँग्रेसला मदत करण्याच्या नादात भाजप देखील आपला जनाधार वाढवू शकली नाही. या उलट सातत्याने संघर्ष करावा लागल्यामुळे शिवसेनेने आणि पर्यायाने बाळू धानोरकर यांनी स्वबळाची पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि 2014 च्या विधानसभेत युती तुटताच ही जागा मोदी लाट असतांना देखील जिंकून दाखवली. पूर्व विदर्भात शिवसेनेनं जिंकलेली ही एकमेव जागा आहे हे विशेष. मात्र 2019 मध्ये भाजप-सेनेत युती होणार याचे संकेत मिळताच बाळू धानोरकर यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश करून चंद्रपूर लोकसभा सर्वांना धक्का देत जिंकून दाखवली. बाळू धानोरकर म्हणजे शिवसेना हे मतदार संघात समीकरण असल्यामुळे ते काँग्रेस पक्षात गेले आणि शिवसेना इतिहास जमा झाली. त्यामुळे युतीत यावेळी भाजप ही जागा कुठल्याच परिस्थितीत शिवसेनेला देणार नाही हे स्पष्ट आहे. भाजपकडून या वेळी माजी कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. 2014 च्या विधानसभेत काँगेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे संजय देवतळे यांनी ऐन वेळेवर भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव झाला. संजय देवतळे यांचा मतदारसंघात मोठा जनाधार असल्यामुळे भाजप पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी बाबत कुठलाच गोंधळ नसला तरी काँग्रेस मध्ये मात्र उमेदवारी वरून चांगलाच खल सुरु आहे. खासदार बाळू धानोरकर हे प्रतिभा धानोरकर म्हणजे आपल्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताय तर दुसरीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.विजय देवतळे आणि जि.प.सदस्य डॉ.आसावरी देवतळे यांनी काँग्रेसकडे उमेदवारीचा दावा केलाय. विजय देवतळे हे माजी मंत्री कै. दादासाहेब देवतळे यांचे चिरंजीव तर आसावरी देवतळे या त्यांच्या स्नुषा आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग या विधानसभा क्षेत्रात आहे. विजय देवतळे हे दादासाहेबांचे राजकीय वारस असून देखील त्यांच्यावर अन्याय झाल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यामुळे यावेळी विजय देवतळे यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. असं झाल्यास संजय देवतळे विरुध्द विजय देवतळे हा चुलत भावांमधला संघर्ष मतदारसंघात पाहायला मिळेल. या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि बसपा वरोरा मतदार संघात विशेष मतदान घेऊ शकली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षांना चांगलं मतदान होईल अशी शक्यता आहे. या दोन्ही आंबेडकरवादी पक्षांना मानणारा एक कॅडर बेस वोटर या भागात आहे आणि असं झाल्यास त्याचा फटका काँग्रेस ला बसू शकतो. वरोरा मतदार संघ हा ओबीसी बहुल मतदार संघ असून शेती आधारित अर्थव्यवस्था आणि निमशहरी तोंडवळा असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसले तरी जलशिवार योजनेच्या माध्यमातून या भागात बरीच कामं झाली आहेत. एखाद्या विशिष्ट मुद्द्यांवर निवडणूक केंद्रीत होईल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणं ज्याला सोडवणे जमेल तोच उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे. विधानसभा 2014 बाळू धानोरकर ( शिवसेना )- 53,877 संजय देवतळे (भाजप ) - 51,873 डॉ. आसावरी देवतळे ( कॉंग्रेस ) - 31,033 भूपेंद्र रायपुरे (बसपा)- 18,759 लोकसभा 2019 बाळू धानोरकर (काँग्रेस) 88627 हंसराज अहिर (भाजप) 76167 राजेंद्र महाडोळे ( बहुजन वंचित) 11788 जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget