हिंदूच्या अधिकारांचं रक्षण करणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं अभिवचन, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ट्रम्प यांचा नवा डाव
उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात अध्यक्षपदासाठी ही लढत होत आहे. अशात ट्रम्प यांनी नवीन मुद्दा उपस्थित करुन सर्वांचं लक्ष वेधलंय.
US Election 2024 Donald Trump : अमेरिकेत सध्या राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण तिथं अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची (US Presidential Election) प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या 5 नोव्हेंबरला अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात अध्यक्षपदासाठी ही लढत होत आहे. अतिशय अटीतटीची लढत होत आहे. दरम्यान, मतदान पुढच्या 4 दिवसावर आले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन मुद्दा उपस्थित करुन सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकाराचे रक्षण करण्याचा मुद्दा मांडला आहे. त्यांनी बांगलादेशसह इतर ठिकाणी हिंदूविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.
ट्रम्प यांनी हिंदूच्या अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन टाकला नवा डाव
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच ट्रम्प यांनी हिंदूच्या अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यानं या निवडणुकीत त्यांनी नवा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हिंदूच्या भावनांचा आदर करुन, त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तसेच धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचे अभिवचन ट्रम्प यांनी दिलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका
दरम्यान, यावेळी बोलताना ट्रम्प यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी इस्रायलपासून ते युक्रेनपर्यंत अमेरिकेचे मोठे नुकसान केल्याचे ट्रम्प म्हणाले.दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या काळात ट्रम्प यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिकेला कमला हॅरिस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रम्प यांचे संतुलन हरवत चालल्याची टीका हॅरिस यांनी केली आहे. त्यांच्यात सुडाची भावना ठासून भरल्याचे हॅरिस म्हणाल्या.
5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बहुतेक ठिकाणी मतदान केंद्रे स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:00 ते रात्री 8:00 पर्यंत खुली असणार आहेत. (6 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार अंदाजे 4:30 ते 6:30 पर्यंत). निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला एक्झिट पोल समजणर आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 नंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण होताच अमेरिकेतील विविध राज्यांतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: