UP Election 2022: मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसवावेत, निवडणूक आयोगाकडे समाजवादी पक्षाची मागणी
10 मार्च रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी स्थळाभोवती मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) निवडणूक आयोगाकडे केली आहे.
UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच 10 मार्च रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी स्थळाभोवती मोबाईल जॅमर (Mobile Jammer) बसवण्याची मागणी समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) केली आहे. यासाठी सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी ठिकाणाभोवती मोबाईलद्वारे हॅकिंगचे प्रकार घडू शकतात, अशी चिंता समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे. म्हणून मतमोजणी स्थळाभोवती मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसोबतच संपूर्ण राज्यातील सर्व जागांवर मतदान पूर्ण झाले. यूपीमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. आता 10 मार्च रोजी निवडणूक आयोग मतमोजणी करून निकाल जाहीर करणार आहे. त्याआधी समाजवादी पक्षाने मतमोजणीच्या ठिकाणी हॅकिंगची शक्यता व्यक्त करत मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी केली आहे.
या पत्रात लिहिलं आहे की, राज्यातील सर्व मतमोजणी स्थळांभोवती मोबाईल जॅमर लावावेत. जेणेकरून मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय निवडणुका संपन्न होईल, अशी समाजवादी पक्षाची मागणी आहे.
दरम्यान, सोमवारी मतदान संपल्यानंतर विविध एजन्सी आणि वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. एक्झिट पोलच्या सर्व आकड्यांमध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा बहुमताच्या आकड्यांपासून दूर असल्याचे दिसत आहे. मात्र असं असलं तरी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी यूपीत समाजवादी पक्षाला 300 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे.
संबंधित बातम्या:
-
UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या टप्प्यात कुणाला किती जागा?, पाहा काय म्हणतोय एक्झिट पोल
- UP Assembly Election 2022 : यूपीमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा, योगींसह अखिलेश यादव यांनी केला 300 जागांवर दावा
-
UP Election 2022: शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मायावतींचे ट्विट, म्हणाल्या - बसपाची 'आयरन सरकार' बनवणे आवश्यक