एक्स्प्लोर

UP Assembly Election 2022 : यूपीमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा, योगींसह अखिलेश यादव यांनी केला 300 जागांवर दावा

आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा दिवस आहे. कारण यूपीमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव या दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज शेवटचा दिवस आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विजयाचे दावे केले आहेत. दोघांनीही 300 च्या पुढे जागांवर विजयाचे दावे केले आहेत.

 पुन्हा 300 च्या वर जागा जिंकू : योगी आदित्यनाथ
 
यूपीमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. पुन्हा एकदा 300 वर जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारने प्रत्येक क्षेत्राकडे लक्ष दिले आहे. गोरखपूरमध्ये एम्स आली आहे. प्रत्येक घरात पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे.

यूपीमध्ये सुरक्षिततेचे उत्तम वातावरण आहे. गरिबांची सुरक्षा आणि कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. समाजवादी पक्षाचे दहशतवादी कनेक्शन नाकारता येत नाही. सपा सरकारने दहशतवादी घटनांशी संबंधित लोकांवरील खटले मागे घेतले. या सगळ्यावर अखिलेश मौन बाळगून आहेत. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवाद्याच्या कुटुंबीयांचे समाजवादी पार्टीशी संबंध आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी समाजवादी पक्ष आरोप करत असल्याचे योगी म्हणाले. काँग्रेस, बसपा आणि सपाच्या लोकांनी जनतेची माफी मागावी, जे यूपीमध्ये तरुणांना मेडिकल कॉलेज देऊ शकले नाहीत. त्यामुळे तरुणांना युक्रेनसारख्या देशात शिक्षणासाठी जावे लागले. आमच्या सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या 1 हजार 400 मुलांना परत आणल्याचे योगी यावेळी म्हणाले.

माझी रोजची दिनचर्या 4 वाजता सुरू होते. पूजा, साधना आणि उपासनेनंतर 7 ते 8 वाजेपर्यंत राष्ट्र आराधना असते. जे लोक दुपारी 12 वाजता उठतात त्यांना ना समस्या सोडवता येतात ना त्यांना समस्यांची कल्पना असते. भाजपला सर्वत्र बहुमत मिळत असल्याचा दावा सीएम योगी यांनी केला आहे.

भाजप सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली : अखिलेश यादव

पहिल्या टप्प्यापासूनच ही निवडणूक जनतेची निवडणूक बनली आहे. कारण जनता भाजप सरकारवर नाराज होती. पहिल्या टप्प्यापासून तरुण-तरुणी समाजवादी पार्टीसोबत आले असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. भाजप सरकार आकडे लपवत आहे. हे सरकार ऐकायला तयार नाही. भाजप सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. भाजपमध्ये कलंकांची कमतरता नसल्याचे ते म्हणाले. लोकांनी भाजपच्या फंदात पडू नये, असे अखिलेश यादव म्हणाले.

ज्यांचे कुटुंब आहे, त्यांना कुटुंबातील सदस्यांचे दु:ख समजते असे अखिलेश यादव म्हणाले. यावेळी जनतेने त्यांना यूपीतून हटवल्याचा मला आनंद आहे. भाजप इतर पक्षाचे नेते फोडून निवडणुका लढवते, तोच फॉर्म्युला आम्ही यावेळी वापरला. निवडणुका अशाच लढवल्या जातात असे अखिलेश म्हणाले. यावेळी सपा आघाडी 300 हून अधिक जागा जिंकत असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला. आणखी सपामध्ये अनेक लोक येणार असल्याचा दावाही अखिलेश यादव यांनी केला. यावेळी जनता भाजपला सातासमुद्रापार फेकून देईल, असे अखिलेश म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिली महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिली महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन
Uddhav Thackeray : अरविंद सावंत, अनिल देसाई 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार
ठरलं...! उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, मुंबईतील शिवसैनिक शक्तीप्रदर्शन करणार
6 षटकार ठोकणाऱ्या युवराजचा आयसीसीकडून सर्वात मोठा सन्मान
6 षटकार ठोकणाऱ्या युवराजचा आयसीसीकडून सर्वात मोठा सन्मान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझाShantigiri Maharaj Nashik Loksabha : निर्णयावर ठाम! शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवणारBuldhana : तापमानाचा पारा वाढल्यानं मतदान केंद्रावर शुकशुकाट, सायंकाळी पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यताNanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिली महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिली महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन
Uddhav Thackeray : अरविंद सावंत, अनिल देसाई 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार
ठरलं...! उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, मुंबईतील शिवसैनिक शक्तीप्रदर्शन करणार
6 षटकार ठोकणाऱ्या युवराजचा आयसीसीकडून सर्वात मोठा सन्मान
6 षटकार ठोकणाऱ्या युवराजचा आयसीसीकडून सर्वात मोठा सन्मान
मराठमोळ्या शेतकऱ्याच्या लेक देशात पहिला; JEE मेन्समध्ये 100 पर्सेंटाईल, फडणवीसांकडून कौतुक
मराठमोळ्या शेतकऱ्याच्या लेक देशात पहिला; JEE मेन्समध्ये 100 पर्सेंटाईल, फडणवीसांकडून कौतुक
RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
Dindori Lok Sabha : आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी
आता माघार नाहीच! माकपच्या जे पी गावितांनी भरला उमेदवारी अर्ज, दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी
Salman Khan House Firing :  सलमान खान घरावर गोळीबार प्रकरण; पंजाबमधून उचलेल्या आरोपींचे बिष्णोई गँगसोबत कनेक्शन?
सलमान खान घरावर गोळीबार प्रकरण; पंजाबमधून उचलेल्या आरोपींचे बिष्णोई गँगसोबत कनेक्शन?
Embed widget