UP Election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यूपीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्या उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
![UP Election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला UP Election 2022 fifth phase of voting process will be held in UP tomorrow UP Election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/85ece49490521e799032e2960f26d2d6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये उद्या 27 फेब्रुवारी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या 12 जिल्ह्यातील 61 जागांवर मतदान पार पडणार आहे. यासाठी सुरू असणाऱ्या प्रचारच्या तोफा काल रात्री थंडावल्या. कााल दिवसभरत दिग्गज नेत्यांच्या सभा उत्तर प्रदेशमध्ये पार पाडल्या. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी दिली आहे.
या जिल्ह्यात होणार मतदान
पचव्या टप्प्यातील मतदानासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या होणाऱ्या पाटव्या टप्प्यात 61 जागांसाठी 692 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पाटव्या टप्प्यासाठी यूपीमध्ये सुमारे 2.24 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती आणि गोंडा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे त्यांच्या जिल्ह्यातील कौशांबीच्या सिरथू विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने अपना दल (कम्युनिस्ट) नेत्या पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी पटेल यांची बहीण आणि केंद्र सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल या केशव प्रसाद मौर्य यांच्या बाजूने प्रचार करत आहेत.
या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या टप्प्यात अयोध्या ते प्रयागराज आणि चित्रकूट या धार्मिक भागात मतदान होणार आहे. अमेठीच्या माजी संस्थानाचे प्रमुख संजय सिंह यावेळी अमेठीतून भाजपचे उमेदवार आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ मोती सिंह, प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी, खादी आणि उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, प्रयागराज जिल्ह्याचा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी या जिल्ह्याच्या दक्षिणेतून नशीब आजमावत आहेत. तर समाजकल्याण मंत्री रमापती शास्त्री गोंडा जिल्ह्यातील सुरक्षीत मानकापूर आणि राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय चित्रकूट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
1993 पासून प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथून निवडणूक जिंकणारे रघुराज प्रताप सिंह यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या जनसत्ता पक्षाकडून पारंपरिक जागेवर रिंगणात आहेत. प्रतापगड जिल्ह्यातच अपना दल (कमरावाडी) अध्यक्ष कृष्णा पटेल हे समाजवादी आघाडीचे उमेदवार म्हणून भाजपशी लढत देत आहेत. कृष्णा पटेल या नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री असलेल्या अनुप्रिया पटेल यांच्या आई आहेत. विधानसभेतील काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा उर्फ मोना याही प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)