Assembly Election : निवडणूक आयोगाकडून प्रचार निर्बंधांमध्ये सूट; नव्या गाईडलाईन्स जारी
Assembly Elections 2022 : निवडणूक आयोगानं उमेदवार आणि पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शोसाठी पुन्हा नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
Assembly Elections 2022 : कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली होती. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढता बाधितांचा आकडा या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं (Election Commission) विधानसभा निवडणुकांच्या प्राचरसभा, रॅलींवर (Road Show) काही निर्बंध लादले होते. परंतु, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असून देशात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच निवडणूक आयोगानं प्रचार सभांवरील निर्बंध सध्या कमी केले आहेत. निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शोसाठी पुन्हा नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
काय आहेत नव्या गाईडलाईन्स?
- 50 टक्के गर्दीसह रॅलीला परवानगी
- रोड शोला मर्यादित संख्येने मंजूर
- आता 1 हजार लोकांच्या भेटीसाठी मंजुरी
- 10 ऐवजी 20 लोकांसह घरोघरी प्रचाराची परवानगी
- सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत निवडणूक प्रचारात सूट
- 300 ऐवजी 500 लोक आता इनडोअर मीटिंगला उपस्थित राहू शकतील
देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणं पाहून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. 21 जानेवारीपर्यंत देशात कोरोनाच्या साडेतील लाख रुग्णांची नोंद केली जात होती. अशातच आज हा आकडा घटला असून दररोज सुमारे 60 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं जरी सूट दिली असली, तरी उमेदवारांना मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
आयोगानं देशातील तसेच ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये झालेली लक्षणीय घट झाल्याचं लक्षात घेतलं. वस्तुस्थिती आणि परिस्थितीच्या आधारावर, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीत अधिकाधिक सहभागाची गरज, आयोग पुढील रीतीने निवडणूक प्रचाराच्या तरतुदी तत्काळ प्रभावाने शिथिल करतो. तसेच प्रचाराच्या वेळेवर बंदी रात्री 8 ते सकाळी 8 ऐवजी रात्री 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. राजकीय पक्ष/उमेदवार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व कोरोना नियमांचं पालन करत प्रचार करू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Assam congress : मुख्यमंत्री हिंमत बिस्वा यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक, आज एनएसयूआयचे आसाम भवनासमोर आंदोलन
- Goa Election : अनेकांकडून प्रचाराला येऊ नका म्हणून फोन आले, कोणत्या पक्षाकडून आले हे आता बोलायला नको : आदित्य ठाकरे
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा