एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आमचे धाकटे बंधू उद्धव ठाकरे... हातात हात घालून मोदी-उद्धव यांची स्टेजवर एन्ट्री
'काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता' अशी आठवण नरेंद्र मोदी यांनी काढली
![आमचे धाकटे बंधू उद्धव ठाकरे... हातात हात घालून मोदी-उद्धव यांची स्टेजवर एन्ट्री Uddhav Thackeray and Narendra Modi come hands in hand on stage in Latur आमचे धाकटे बंधू उद्धव ठाकरे... हातात हात घालून मोदी-उद्धव यांची स्टेजवर एन्ट्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/09130116/modi-uddhav-PLAIN.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : लातूरमधील औसामध्ये आयोजित शिवसेना-भाजप महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल अडीच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले. यावेळी हातात हात घालून मोदी आणि उद्धव यांनी मंचावर प्रवेश केला. त्यानंतर मोदी-उद्धव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी हात उंचावत महायुतीचा जयघोष केला.
'शिवसेना पक्षप्रमुख आणि धाकटे बंधू उद्धव ठाकरे' असा उल्लेख करत पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत, सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद असा उल्लेख मोदींनी सुरुवातीलाच केला.
लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, यावरुन शिवसेना-भाजपमध्ये युतीपूर्वी झालेली खडाखडी नवीन नाही. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीही शिवसेना मोठा भाऊ असल्याचं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, तर देशात भाजप मोठा भाऊ असल्याचं आधी म्हटलं जायचं. युती होण्यापूर्वी सेना खासदार संजय राऊत यांनी 'मोठा भाऊ हा मोठा भाऊ असतो' असं म्हटलं होतं. त्यानंतर मोदींनी उद्धव यांचा धाकटा भाऊ असा उल्लेख केल्याने, चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला होता, असं म्हणत बाळासाहेबांचीही आठवण काढली. 'काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता' असं मोदी म्हणाले.
VIDEO | लातूरच्या औसा येथे महायुतीची जाहीर सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | लातूर
लातूरचे भाजप उमेदवार सुधाकरराव शिंगारे आणि उस्मानाबादेतून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली होती.
शरदराव तुम्ही तिकडं शोभत नाहीत, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका
गेल्या काही वर्षांत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यथेच्छ तोंडसुख घेतलं होतं. त्यानंतर निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लातूरमधील सभेच्या निमित्ताने मोदी आणि उद्धव अडीच वर्षांनी जाहीर मंचावर एकत्र आले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)