Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते सुनील जाधव आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल माळी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक संवेदनशील होऊन गेलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये आज (20 नोव्हेंबर) तणावाची स्थिती पाहायला मिळाली. कसबा बावड्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. कसबा बावड्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते सुनील जाधव आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल माळी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांची तत्काळ घटनास्थळी भेट घेतली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवीकरण इंगवले सुद्धा त्या ठिकाणी होते. यावेळी सतेज पाटील यांनी अजून बरेच मतदान बाकी असल्याचे सांगत रविकिरण इंगवले यांची समजून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
Samarjeetsinh Ghatge : पालकमंत्र्यांचा मंदिरात बूथ, शपथा, लिंबू, लोकांना दमदाटी; अहो साहेब निदान मतदानाच्या दिवशी तरी देवाला सोडा! समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर हल्लाबोल #kolhapur #kagal @ghatge_raje @mrhasanmushrif https://t.co/4vrJ1xJgJV
— ABP माझा (@abpmajhatv) November 20, 2024
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरु आहे. जिल्ह्यात मतदानादिवशी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदान झाले आहे. मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यामध्ये नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृत्तीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान? #Maharashtra #kolhapur #sangli https://t.co/8mkqS2Ys1E
— ABP माझा (@abpmajhatv) November 20, 2024
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, स्वयंसहाय्यक, पिण्याचे पाणी, रॅम्प, आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध देण्यात आल्याबद्दल दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात 143 थिमॅटीक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही मतदान केंद्रे पाहण्यासाठी व येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक व मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट वर छायाचित्रे घेण्यासाठी तरुणांसह वयोवृध्द मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
इतर महत्वाच्या बातम्या