एक्स्प्लोर

Sushma andhare: 'रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य, 5 तारखेपर्यंत आग...'; सुषमा अंधारेंचा बोचरा वार, म्हणाल्या, 'ज्यांच्या जीवावर...'

Sushma andhare: शिवसेना शिंदे गटाकडू उत्तर देताना आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत आगीत तेल टाकत असल्याचं सांगत त्यांच्याकडे लक्ष्य देण्याची गरज नसल्याचं म्हटलं त्यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुती सरकारने मोठं यश मिळवलं. गुरूवारी राज्यात मुख्यमंत्र्यांसोबतच इतर काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडली आहे. अशातच त्यांच्या तब्येतीमध्ये अद्याप सुधारणा झालेली नाही. त्यांना ताप, सर्दी आणि घशाच संसर्ग झाला आहे, त्यामुळे ते भेटीगाठी टाळत आहे, बैठका रद्द करत आहेत. या दरम्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री आणि मंत्रीपदावरून तसेच त्यांच्या प्रकृतीवरून लक्ष केलं, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडू उत्तर देताना आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी संजय राऊत आगीत तेल टाकत असल्याचं सांगत त्यांच्याकडे लक्ष्य देण्याची गरज नसल्याचं म्हटलं त्यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहून गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांना डिवचलं आहे. "आमदार गुलाब पाटील (gulabrao patil) ज्याअर्थी म्हणताहेत की, संजय राऊत साहेब आगीत तेल टाकत आहेत.  याचाच दुसरा अर्थ,"रान पेटलंय" हे गुलाब पाटील (gulabrao patil) मान्य करतात..!! गुलाबराव 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच EDचा दोरखंड सुद्धा आवळू शकतात", अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी लिहली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्रीपद हे भाजपकडं जाणार आहे, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. तर गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) रस्सीखेच सुरु आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात,अशी पोस्ट केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केला होता.  

त्याचबरोबर आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपचे लोक गेले, यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मुळात ती खरी शिवसेना नाही. ते डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. अडीच-तीन वर्षांपूर्वी त्यांना यासाठी गोंजारण्यात आले की, आमची मूळ शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता. त्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. पण, आता त्यांना कळेल की, भारतीय जनता पक्ष काय आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे', असं त्यांनी म्हटलं त्यावरती आज पत्रकार परिषदेमध्ये गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं.

गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते रोज सकाळी सुरू होतात. त्यामुळे तुम्ही देखील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर राऊत आगीत तेल टाकत आहेत, असं म्हटलं त्यावरून आता सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांसह शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
Embed widget