एक्स्प्लोर

Shrikant Shinde: मला केंद्रात मंत्रिपदाची संधी होती, तेव्हा नकार दिला, उपमुख्यमंत्रिपदावर श्रीकांत यांचं मोठं भाष्य

Shrikant Shinde Maharashtra Goverment: श्रीकांत शिंदे यांनी पोस्ट उपमुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

Shrikant Shinde Maharashtra Goverment: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशा चर्चांनी गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चा पत्रकारच करतात, असं म्हणत फेटाळून लावले होते. आता श्रीकांत शिंदे यांनी देखील एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत सांगितले. 

मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती- श्रीकांत शिंदे

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. 

श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण पोस्ट-

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. 

एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द-

एकनाथ शिंदे दरे या गावातून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे. तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.  डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहे. 

संबंधित बातमी:

Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं?
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं?
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Dharashiv ZP Election: जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
जिल्हा परिषदत निवडणुकीत वेगळी चूल; निकालनंतर महायुती तानाजी सावंतांना वगळून सत्ता स्थापन करणार? अध्यक्षपदावरूनही रस्सीखेच
Embed widget