एक्स्प्लोर

भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, सोयाबीनच्या दरावरुन आमदार कैलास पाटलांचा हल्लाबोल 

Kailas Patil : उस्मानाबाद विधानसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाच उमेदवार कैलास पाटलांनी (Kailas Patil) सोयाबीन दरावरून भाजपवर खोचक टीका केली आहे.

Kailas Patil : मराठवाडा (Marathwada) हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे (Soybean) पीक घेतलं जातं. गेल्या काही दिवसात ढासळलेल्या सोयाबीनच्या भावाचा निवडणूक प्रचारात जोर धरतोय. धाराशीव विधानसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाच उमेदवार कैलास पाटलांनी (Kailas Patil) सोयाबीन दरावरून भाजपवर खोचक टीका केली आहे. सोयाबीनची पेंड कोंबड्या खातात. त्यासाठी भाजपने ती आयात केली आहे. त्यामुळं सोयाबीनचे भाव ढासळले आहेत. भाजपाला शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, त्यांना मतदान का करावं? असा खोचक सवाल कैलास पाटील यांनी केला.

पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावातूनच शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव ढासळले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे. भाजपला शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, मग शेतकऱ्यांनी त्यांना का मतदान करावं असा सवाल पाटील यांनी केला. पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावाला बळी पडून भाजपने सोयाबीनची पेंड आयात केली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव ढासळले ही टीका पाटील यांनी केली आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सरकारने अनुदानाची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष अनुदान मिळालं नाही असेही पाटील म्हणाले. 

धाराशिव मतदारसंघात कोण मारणार बाजी? 

धाराशीव विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून कैलास पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. तसे सध्या धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले होते. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. कैलास पाटील यांना तिकीट मिळाल्याचं कन्फर्म झाल्यानंतर कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून 'कैलास पर्व' असे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करण्यात आले. कैलास पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे (Ajit Pingle) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं धाराशीव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला आहे. यामध्ये आता कैलास पाटील हे बाजी मारणार की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget