शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Maharashtra Assembly Elections 2024 : कैलास पाटील धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले होते.
धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Elections 2024) बिगूल वाजल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना (Shiv sena) पक्षफुटीवेळी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील (kailas Patil) यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) धाराशिव विधानसभा मतदारसंघात (Dharashiv Assembly Constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे (Ajit Pingle) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आता अजित पिंगळे यांनी कैलास पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.
शिवसेनेच्या बंडावेळी सध्याचे उबाठाचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सहभागी होते. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, असा आरोप करत कैलास पाटील वारंवार एकनाथ शिंदे यांना बंडासाठी विनंती करत होते. मात्र, ऐनवेळी लालचेपोटी कैलास पाटील हे ठाकरे गटात सामील झाले, असा आरोप अजित पिंगळे यांनी कैलास पाटील यांच्यावर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे काय बोलणार?
दरम्यान, शिवसेना फुटीवेळी गुजरात बॉर्डरवरून स्वतःची सुटका करून घेऊन कैलास पाटील ठाकरे यांच्याकडे मुंबईला परत आले होते. त्यावेळी याची मोठी चर्चा झाली होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पिंगळे यांनी कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून ते याबद्दल काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिवमधून कोण मारणार बाजी?
कैलास पाटील धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले होते. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. कैलास पाटील यांना तिकीट मिळाल्याचं कन्फर्म झाल्यानंतर कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून 'कैलास पर्व' असे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करण्यात आले. पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आता धाराशिवमधून कैलास पाटील की अजित पिंगळे? कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र, पूनम महाजनांचा खळबळजनक दावा; नव्याने चौकशीची मागणी करणार!