एक्स्प्लोर

Sharad Pawar: नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार सत्तास्थापनेबाबत काय म्हणाले?

Maharashtra Politics: दिल्लीत एनडीए आघाडीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली. इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एनडीएची साथ सोडणार का?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात 400 पारची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठा झटका बसला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर 272 ची मॅजिक फिगर गाठणाऱ्या भाजपचा (BJP) विजयरथ यंदा 240 जागांवर रोखला गेला. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) गोटातून सध्या एनडीएचा (NDA) भाग असणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाष्य केले.

आज इंडिया आघाडीची दुसरी बैठक आहे. गेल्या बैठकीत अनेक नेते उपस्थित नसल्यामुळे फारशी चर्चा झाली नव्हती. आता या दुसऱ्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल. इंडिया आघाडीचा नेता कोण असेल, पंतप्रधान कोण असेल,यावर आता चर्चा करणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. या बैठकीला सगळ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रात सत्तास्थापनेबाबत संख्याबळ बघून निर्णय घेतला पाहिजे. संख्याबळाकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. 

नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली का? शरद पवार म्हणाले

लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मला याबाबत काही माहिती नाही. पण मी पेपरात वाचले की, नितीशकुमार यांनी आपण एनडीएतच राहणार असल्याचे सांगितले. ते मी वाचलं, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्तही शरद पवार यांनी फेटाळले. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे काही ठरेल, त्यानुसार आम्ही पुढे वाटचाल करु, असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

भाजप- 240
काँग्रेस- 99

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

आणखी वाचा

शरद पवार ''मॅन ऑफ द सिरीज''; निकालानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवारांचे पाय धरले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget