Sharad Pawar : बीडचा आदर्श उद्ध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा, परळीत शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar on Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना पराभूत करा आणि राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.
Sharad Pawar on Dhananjay Munde : "पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा", असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते परळीतील प्रचार सभेत बोलत होते.
परळीने आम्हाला एक जीवाभावाचा सहकारी दिला
शरद पवार म्हणाले, आज बऱ्याच दिवसातून माझं परळीला येणं झालं. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही आणि सहकारी विरोधी पक्षात होतो. त्या काळामध्ये या परळीने आम्हाला एक जीवाभावाचा सहकारी दिला. त्यांचं नाव रधुनाथराव मुंडे होतं. ते आमदार होते. जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारे नेते होते. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवाने मुंबई शहरामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला? हे माझ्या सारख्याला हे अजून देखील उलगडलेलं नाही. त्यांची आठवण आमच्या अंतकरणामध्ये कायमची राहिली. आणखी एका व्यक्तीची मला नेहमी आठवण होते. ते म्हणजे परळीची नगरपरिषद आणि त्याचं नेतृत्व राधाबाई यांच्याकडे होतं. त्या या शहराचं नेतृत्व करत होत्या. कष्ट करत होत्या. लोकांचे प्रश्न सोडवायच्या. एक लहान समाजाची महिला जबाबदारी मिळाल्यानंतर कसं काम करु शकते. त्याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं.
परळीचं विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचं
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं काम परळीने केलं. कोणत्याही राज्याची प्रगती करायची असेल तर त्या राज्याला पाणी पाहिजे किंवा वीज पाहिजे. महाराष्ट्राला वीज देण्याचं काम परळीतून होतं. अनेक लोक या ठिकाणी काम करतात. त्यांच्या कष्टातून विद्युत निर्मिती होती. परळीचं विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचं आहे. किती तरी लक्षात राहतील अशा गोष्टी परळीचे वैशिष्ट्य होतं. अलिकडच्या काळात परळीला काय झालंय मला माहिती नाही. परळीमध्ये गुंडगिरी वाढली. मला येथील व्यापाऱ्यांची आणि दुकानदारांची पत्र येतात. त्यांना धंदा करता येत नाही. येथील काही शक्तींना नियंत्रण पाहिजे. ही स्थिती बदलण्याची भूमिका घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या