एक्स्प्लोर

NCPSP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी लवकरच, मविआच्या जागावाटपासंदर्भात मोठी अपडेट समोर

NCP SP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई :  निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज तारखा जाहीर होतील. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय देखील झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आघाडी घेतली जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लवकरच पहिली यादी जाहीर केली जाईल.  

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी लवकरच

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढवल्या त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवला. लोकसभेतील शरद पवारांच्या पक्षाची कामगिरी पाहून त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या दृष्टीनं महत्त्वाची असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी लवकरच केली जाणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजेच 19 किंवा 20 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी येणार आहे. 

मविआच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. सध्या महाविकास आघाडीमध्ये 230 जागांवर एकमत झालं असल्याची माहिती आहे. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर होणार आहेत. मविआमध्ये आता केवळ 58 जागांची चर्चा बाकी असल्याची माहिती आहे. येत्या 2 दिवसांत यावर देखील तोडगा निघणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काँग्रेसच्या वर्तुळातील जागावाटपाबाबत चर्चा 

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. या 288 जागांपैकी काँग्रेसला 119 जागा मिळू शकतात अशी चर्चा आहे. यामध्ये 10 ते 15 जागा कमी जास्त होऊ शकतात. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला 86 जागा मिळू शकतील अशा देखील चर्चा आहेत. यामध्ये देखील 10 ते 15 जागा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 75 जागा, शेकापला 3, समाजवादी पार्टीला 3 आणि सीपीएमला 2 जागा दिल्या जाण्याच्या चर्चा आहेत. याशिवाय मविआत 10 ते 15 जागावर चर्चा सुरु असल्याबाबतची माहिती काँग्रेसच्या वर्तुळातून मिळत आहे. 

दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणूक जाहीर करेल, त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होईल. 

इतर बातम्या : 

Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?

Maharashtra Vidhansabha Election 2024: मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget