Satara Assembly Election : सातारा जिल्ह्यातील विधानसभा लढती ठरल्या, कोण बाजी मारणार? 8 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Satara District Vidhan Sabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. या आठ जागांवर काट्याची लढाई होत आहे.
Sataa District Vidhan Sabha Election 2024 सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सातारा जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. एकेकाळी सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालत होता. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याकडं पाहिलं जायचं. मात्र 2014 नंतर सातारा जिल्ह्यात भाजप आणि सेनेला मतदारांचा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. साताऱ्यातील अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप सेनेची वाट धरली. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ (Satara District Vidhan Sabha Election) आहेत.आठ पैकी सहा मतदारसंघ सातारा लोकसभा तर दोन मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Satara Lok Sabha Election Result 2024) इथे भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात लढत झाली. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1, भाजप 2, शिवसेना 2 जागा मिळाली होती. आता सातारा जिल्ह्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमेदवार | महाविकास आघाडी उमेदवार | वंचित/ अपक्ष अन् इतर | विजयी उमेदवार |
1 | फलटण | सचिन पाटील (NCP-AP) | दीपक चव्हाण (NCP-SP) | ||
2 | वाई | मकरंद पाटील (NCP-AP) | अरुणादेवी पिसाळ (NCP-SP) | ||
3 | कोरेगाव | महेश शिंदे (Shivsena) | शशिकांत शिंदे (NCP-SP) | ||
4 | माण | जयकुमार गोरे (BJP) | प्रभाकर घार्गे (NCP-SP) | ||
5 | कराड उत्तर | मनोज घोरपडे (BJP) | बाळासाहेब पाटील (NCP-SP) | ||
6 | कराड दक्षिण | अतुल भोसले (BJP) | पृथ्वीराज चव्हाण (Congress) | संजय गाडे (VBA) | |
7 | पाटण | शंभूराज देसाई (Shivsena) | हर्षद कदम (Shivsena UBT) | सत्यजीतसिंह पाटणकर (Ind) | |
8 | सातारा | शिवेंद्रसिंहराजे भोसले (BJP) | अमित कदम (Shivsena UBT) |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1) फलटण विधानसभा (255) (अनुसूचित जाती)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील विधानसभेच्या रिंगणात आहेत.
2) वाई विधानसभा (256)
वाई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील पुन्हा निवडणूक लढवत आहेत. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ निवडणूक लढवत आहेत.
3) कोरेगाव विधानसभा (257)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे या ठिकाणी आमने सामने आहेत.
4) माण विधानसभा (258)
भाजपचे जयकुमार गोरे पुन्हा रिंगणात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर घार्गे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.
5)कराड उत्तर विधानसभा (259)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात लढत होत आहे.
6) कराड दक्षिण विधानसभा (260)
कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत असून त्यांच्यापुढं भाजपच्या अतुल भोसलेंचं आव्हान आहे.
7) पाटण विधानसभा (261)
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर रिंगणात आहेत.
8) सातारा विधानसभा (262)
भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अमित कदम रिंगणात आहेत.
इतर बातम्या :