साताऱ्यात 8 मतदारसंघातील लढती ठरल्या, विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात, मविआ अन् महायुतीच्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election 2024 : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख सामना आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Satara सातारा : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण मतदारसंघ आहेत. साताऱ्यातील सर्व मतदारसंघातील लढतील निश्चित झाल्या आहेत. वाई आणि माण विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार जाहीर काल जाहीर झाले आहेत.
साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार :
सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
पाटण- शंभूराज देसाई (शिवसेना)
कराड दक्षिण - अतुल भोसले (भाजप)
कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजप)
फलटण- सचिन पाटील कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोरेगाव- महेश शिंदे (शिवसेना)
माण- जयकुमार गोरे (भाजप)
वाई- मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार
सातारा - अमित कदम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
पाटण- हर्षद कदम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
कराड उत्तर- बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
फलटण- दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
कोरेगाव- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
माण- प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
वाई- अरुणादेवी पिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष रिंगणात
सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होत असते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शंभूराज देसाई निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मविआच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मिळेल, अशी आशा होती ते शक्य नसल्यानं सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
माण विधानसभा मतदारसंघाच्या लढतीतून प्रभाकर देशमुख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शरद पवारांनी प्रभाकर घार्गे यांना संधी दिली आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. .
इतर बातम्या :