Saroj Patil : शरद मोठा वटवृक्ष आहे, ही गर्दी पाहून मला वाटतं हसन मुश्रीफ गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा जोरदार हल्लाबोल
Saroj Patil, कोल्हापूर : सरोज पाटील यांनी कोल्हापुरातील सभेत हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली आहे.
Saroj Patil, कोल्हापूर : "शरद मोठा वटवृक्ष आहे. ही गर्दी पाहून मला वाटतं मुश्रीफ नक्की गाडला जाणार आहे. शरद पवार यांनी याला काय दिल नाही ते सांगा. खा खा खायचं आणि चौकशी लागली पक्ष फोडून पळून जायचं. आमचे जयंतराव पळून गेले का बघा? गद्दार लोकांना मतं दिली तर लोकशाही मेली असं समजा आणि दुसरा ट्रम्प आला म्हणून समजा", असं म्हणत सरोज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्ला केला. त्या कोल्हापुरातील कागलमध्ये समरजीत घाटगे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या.
सरोज पाटील म्हणाल्या, तुमची मुलं त्या भिड्याच्या नादाला लागली आहेत का बघा. त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका. सगळा जाती द्वेष पसरवला जात आहे. शरद पवार यांना लहानपणापासून पाहिलं आहे. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते अग्रभागी असायचा. आमचंच रक्त ज्यांच्यात आहे तो आमच्याच घरातील गडी ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडं गेलाय. शरदने अजितला लहानाचा मोठा केला तो अजित या वयात शरदला सोडून पळून गेला. म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून गेल्यासारखं दुःख झालं. माझ्या भावाच्या अंगात धाडस आहे, या वयात पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं.
समरजीत घाटगे म्हणाले, गैबी चौकात शेवटची सभा घ्यायची होती. मात्र आमच्या विरोधकांनी गैबी चौक बुक करून ठेवला. मी इथं एक ही माणूस कर्नाटकातील किंवा पैसे देऊन आणलेला नाही. गद्दारी करणाऱ्यांना जागा दाखवण्याची ही निवडणूक आहे. 25 वर्षात इथं एकही शाळा उभारली नाही. 25 वर्षात एकही मोठं हॉस्पिटल कागलमध्ये का नाही? कोल्हापुरात 1100 बेडचे रुग्णालय केलं किमान 500 बेडचे रुग्णालय कागलमध्ये का आणलं नाही.
मराठा समाजाचे किती दाखले कागलमध्ये दिले हे पालकमंत्री यांनी सांगावे. ज्या चौकात राम मंदिर आहे त्या खर्डेकर चौकाला मुश्रीफ साहेब अशुभ म्हणतात. राम मंदिराचा अवमान केला म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आमच्या लोकांना धमकी दिली जातेय. जे काय बोलायचं ते मला बोला माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या घरातील या समरजित घाटगेला एकदा संधी देऊन बघा. आज सांगतो पालकमंत्री यांची सत्ता गेली आहे हे आता सांगतो, असंही घाटगे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या