एक्स्प्लोर

Sharad Pawar : धंद्यात मदत केली, जिल्हा परिषद , मंत्रिपद सगळं काही दिलं, पण हा रुपया खोटा निघाला, भरणेंना पाडा, शरद पवार इंदापुरात आक्रमक

Sharad Pawar, इंदापूर : धंद्यात मदत केली, जिल्हा परिषद , मंत्रिपद सगळं काही दिलं, पण हा रुपया खोटा निघाला, असं म्हणत शरद पवारांनी दत्तात्रय भरणेंना पराभूत करण्याचं आवाहन केलं आहे.

Sharad Pawar, इंदापूर : "छत्रपती कारखाना भरणेंच्या हातात दिला, ही आमची चूक झाली. इतर कारखान्यांपेक्षा या कारखान्यात भाव कमी मिळतो. 600 रुपये भाव कमी मिळतो. अनेक गोष्टींमध्ये भरणेंना मदत केली. गुजरातच्या उद्योगपतींकडून मदत मिळवून दिली. त्यांना वाहतुकीच्या धंद्यात मदत केली. निवडणुकीला उभं राहायचं म्हणाले. जिल्हा परिषद, विधानसभा , मंत्रिपद दिलं. सगळं दिल्यावर निघून गेला. ही कसली माणसं आहेत. यांच्या पाठिला कणा नाही. हे नेतृत्व खोटं निघालं. रुपया खोटा निघाला. उद्याचं निकाल घावा लागला. भरणेंना... पाडा... पाडा ..पाडा ..हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते इंदापूरमध्ये बोलत होते. हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, सध्या तरुण पिढीमध्ये बेकारीचं प्रमाण वाढलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये 4 लाख विद्यार्थी शिकतात. बारामती सारख्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठाण सारखी संस्था स्थापन काढली. हर्षवर्धन पाटलांनी देखील काही संस्था काढल्या. चिंता एका गोष्टीची आहे, मुलं शिकली पण सर्वांनाच नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे तरुण निराशेत जगतो. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते लोक बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण तसं काही झालं नाही. महाराष्ट्रात अनेक चांगले कारखाने होते, लोकांच्या हाताला काम देत होते. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आलं, हळूहळू महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले. 

आम्ही ठरवलं घटनेला धक्का लागू द्यायचा नाही. मोदींना 400 जागा मिळू द्यायचे नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तिला तुम्ही साथ दिली. महाराष्ट्रात अनेक जागा तुम्ही निवडून दिल्या. आता विधानसभेची निवडणूक आहे. राज्य चांगल्या वाटेवर आणण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आपल्या राज्याचा पहिला क्रमांकावर होता. फडणवीसांचं आणि भाजपचं राज्य आलं की, आपण सहाव्या क्रमांकावर आलो. दिवसेंदिवस आपली निर्यात कमी होताना दिसत आहे, असंही शरद पवारांनी नमूद केलं. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही अनुकूल निर्णय दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदींच्या मनात सत्ता आल्यानंतर वेगळा विचार सुरु होता. त्यांनी संविधान बदलाचा विचार सुरु केला होता. आज हा देश एकसंघ आहे, याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले घटना आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. खाली श्रीलंका आहे, तिथे संघर्ष झाला. देश एकसंघ राहण्याची स्थिती चिंताजनक झाली. बांगलादेशच्या राष्ट्रपतींची हत्या झाली. भारतात लष्कराने देशाचा कारभार घेतला, असं कधी झालं नाही. या देशातील लोकांचं वैशिष्ट आहे. रोजगार हमीवर जाणाऱ्या लोकांच्या मताचं महत्त्वही तेवढचं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget