(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सकाळी उठल्यावर संजय राऊतांना रोज बांग द्यावी लागते, तसं न केल्यास त्यांना भाकर भेटत नाही; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका
Raosaheb Danve On Sanjay Raut: सकाळी उठल्यावर नऊ वाजता संजय राऊत यांना रोज बांग द्यावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना संध्याकाळी भाकर भेटत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बटेंगे तो कंटेंगे असा प्रचार करत भाजपने समाजा-समाज्यात तेढ निर्माण करू नये, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हंटले आहे. त्यावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत टीका केली आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच जाती-जातीत तेढ निर्माण करत मतं मिळवण्याचे काम करत आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण जर कुणी वापरलं असेल तर ते पंतप्रधान मोदींनी वापरलंय, असं दानवे म्हणाले. तर यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाण साधला आहे. सकाळी उठल्यावर नऊ वाजता संजय राऊत यांना रोज बांग द्यावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना संध्याकाळी भाकर भेटत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.
महायुतीच्या 185 जागा निवडून येतील- रावसाहेब दानवे
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्राचारार्थ शेवगाव येथे प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला (Mahayuti) खुप चांगले वातावरण असल्याचे म्हंटले आहे. तसेच लोकसभेत जे वातावरण होते त्याच्या विपरित वातावरण असून याचा महायुतीला चांगला फायदा होईल आणि महायुतीच्या (Mahayuti) 185 जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
....तर संजय राऊतांना संध्याकाळी भाकर भेटत नाही- रावसाहेब दानवे
विधानसभा निवडणुकीत गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहे, असा आरोप महायुती सरकारवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे. सकाळी उठल्यावर नऊ वाजता संजय राऊत यांना बांग द्यावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना संध्याकाळी भाकर भेटत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. तर ते काय बोलतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही, असही दानवे यांनी म्हटलंय.
हे ही वाचा