काँग्रेसच्या भरोशावरती मुख्यमंत्री आणि काँग्रेसशीच गद्दारी, जालन्यात नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर प्रहार
Nana Patole on Ashok Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर जोरदार टीका केली.
Nana Patole on Ashok Chavan : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) आखाडा चांगलाच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज जालना इथं आयोजीत केलेल्या सभेज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या भरोशावरती मुख्यमंत्री झालेला आणि काँग्रेस बरोबर गद्दारी केलेल्या व्यक्तीने निवडणूक शपथपत्रामध्ये सहा महिन्यापूर्वी हिऱ्यांची किंमत 76 लाख होती. त्यानंतर आता सहा महिन्यानंतर त्याची किंमत 96 लाख झाली आहे असेही पटोले म्हणाले.
कैलास गोरंट्याल यांना 1 लाख मतांनी निवडून द्या
जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारसभेत नाना पटोले बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, यावेळी कैलास गोरंट्याल हे 1 लाख मतांनी निवडून आले पाहिजेत. अनेकांनी मतविभाजनासाठी काही उमेदवार उभे केले असल्याचे पटोले म्हणाले. या निवडणुकीत मतदानाची विभाजन होऊ देऊ नका असे पटोले म्हणाले. महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला उत्तर द्यायंच असेल तर गोरंट्याल यांना 1 लाख मतांनी विजयी करा असे आवाहगन पटोले यांनी केलं. विलासराव देशमुख हे माझे राजकीय गुरु आहेत. त्यांनी या मराठवाड्यात पाणी आणण्याचे अनेक योजनांची पायाभरणी केल्याचे पटोले म्हणाले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत दिली नाही
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) सरकारनं काहीही मदत दिली नाही, असी टीकाही नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. आम्हाला पूर्णाचे, जायकवाडीचे पाणी पाहिजे असे नाना पटोले म्हणाले. आम्हाला आमच्या अधिकाराचं पाणी मिळालं पाहिजे असे नाना पटोले म्हणाले. ते पाणी देण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार करेल असे आश्वासन पटोले यांनी दिलं. 10 वर्ष पंतप्रधान नरोंद्र मोदी यांचं सरकार आहे. 10 वर्षात देशातील लोकांना एकत्र आणू शकले नाहीत. तेच पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित येऊन बटेंगे तो कटेंगे असं सांगत आहेत. सातत्यानं हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या दैवतांचा अपमान करत असल्याची टीका पटोले यांनी केली. त्यामुळं या लोकांना सत्तेपासून दूर करण्याचं काम करायचे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे सरकार आणायचे असल्याचे नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Nana Patole : देवेंद्र फडणवीस निवडूनच येणार नाहीत, मग मुख्यमंत्री कसे होणार? नाना पटोलेंचा टोला