एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी भेट देऊ; उस्मानाबादेतील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांची ऑफर

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची चर्चा सुरु असताना उस्मानाबाद इथल्या एका राजकीय नेत्याने आमदारांना चक्क सफारी गाडीची ऑफर दिली आहे.

Rajya Sabha Election 2022 : एकीकडे राज्यसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु आहे. तसंच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची चर्चा सुरु असताना उस्मानाबाद इथल्या एका राजकीय नेत्याने आमदारांना चक्क सफारी गाडीची ऑफर दिली आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी ही ऑफर दिली आहे. तसंच आज (31 मे) मुंबई इथे सकाळी अकरा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचाही दावा निटूरे यांनी यावेळी केला. 

राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देऊ. हे कोणतेही आमिष नसून मतदारसंघात त्यांना काम करता यावं यासाठी भेट असणार आहे, अशी घोषणा अरुण निटुरे यांनी केली आहे. दरम्यान अरुण निटूरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी 26 लाखप्रमाणे 11 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. निटुरे यांची ऑफर आमदार स्वीकारतील का? असा प्रश्न जरी असला तरी त्यांच्या या ऑफरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

लालच म्हणून ऑफर नाही : अरुण निटूरे
"सर्व आमदारांनी, सर्व पक्षांनी मला सहकार्य करावं. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आण संसदेत पाठवावं. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. मला जर संसदेत पाठवलं तर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करता यावं म्हणून सफारी गाडी देऊन मदत करु शकतो. हे लालच नाही तर कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना सहकार्य करु याची हमी देतो," असं अरुण निटूरे यांनी म्हटलं. 

10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक
येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ संपला आहे. संजय राऊत, विकास महात्मे, पियूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल पटेल आणि पी चिदंबरम यांचा कार्यकाळ संपला आहे. 
महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. तर सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यत आहे. शिवसेनेने सहाव्या जागेवर दावेदारी करत कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.  

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?
शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना तिकीट दिलं आहे. तर भाजपने पियुष गोयल, अनिल सुखदेवराव आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Embed widget