एक्स्प्लोर

Rahul Gandhi on RSS: संघाने घटनेवर नाही तर थोर पुरुषांच्या विचारधारेवर हल्ला केला, नागपुरातून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते केवळ एका पुस्तकावर नाही तर या देशातील महापुरुषांच्या विचारधारेवर हल्ला करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या संविधानामध्ये भारताचा एक दृष्टिकोन आहे. हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्या- मरण्याचा मार्ग आहे. देशात जगताना एकमेकांचा आदर करू, यात असे कुठे म्हटले नाही की एक व्यक्ती, एक संस्था ही संपूर्ण हिंदुस्थानची संपत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रत्येकाच्या मतांचा आदर केला पाहिजे. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS), भाजपचे लोक संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते केवळ या पुस्तकावर हल्ला नाही तर या देशातील महापुरुषांच्या विचारधारेवर, जनतेच्या आवाजावर हल्ला करतात.

संविधानाने या देशातील संस्था तयार होतात. संविधान नसतं तर निवडणूक आयोग देखील नसतं. राजा महाराजांजवळ इलेक्शन कमिशन नव्हतं. त्यामुळे या संविधानमुळे शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र इत्यादी संस्था मिळातात. मात्र आरएसएस (RRS) यावर थेट हल्ला करत नाही, ते भितात. कारण समोरून लढायला तयार झाले तर ते पाच मिनिटात हरतील, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून ते समोरून येतं नाही. किंबहुना ते लपून वार करतात अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

जातीय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे- राहुल गांधी 

देशाच्या प्रत्येक राज्यात असे काही नावं मिळतातकी त्यांची आपण आठवण करतो. त्यातून प्रेरणा मिळते. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा आपण देतो, त्यांच्या चर्चा आपण करतो, त्यावेळी त्या केवळ एका व्यक्तीबद्दल नाही तर कोट्यावधी लोकांचा आवाज असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा दुसऱ्यांचे दुःख त्यांच्या तोंडातून निघत होते. मी महामानव आंबेडकर यांची अनेक पुस्तक वाचली आहे. मला काय हवं आणि जनतेला काय हवं यातून ते जनतेचा विचार करत होते. देशात करोडो दलित आहे. त्यांचे दुःख, त्यांचा आवाज या संविधानात यायला हवा. या संविधानात फुले-शाहू-आंबेडकर-गांधी यांचा आवाज आहे. आपण आज संरक्षण करतोय ते हजारो वर्ष जुनं पुस्तक आहे. जातीय जनगणना याची हाक मी दिलीय. जातीय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

जातीय जनगणना म्हटलं तर मोदीजी यांची झोप उडाली - राहुल गांधी

देशात 90  टक्के लोकांजवळ काही ताकद नाही. याचा काय अर्थ? बिना शक्ती, संपत्ती सन्मानाचा काय फायदा?  मी म्हटलं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख करा, त्यात ओबीसी, दलित नावं नव्हते. न्यायव्यवस्था बघितली तर तेथे मोठे अधिकारी बघा. यात 90 टक्के भारत आपल्याला दिसतंच नाही. अदानी यांच्या कंपनीत मोठ्या पदांवर एक दलित नाही, आदिवासी नाही. पाच टक्के लोक देशाला चालवत आहे. 16 लाख कोटी रुपये त्यांचे माफ होतात. कर्नाटकात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. माझ्यावर टीका केली. मात्र आदानी यांनी पैसे दिले नाही तर त्याला देशभक्त मानतात. शेतकऱ्यांनी कर्ज दिलं नाही तर त्याला डिफॅाल्टर मानतात. जातीय जनगणना म्हटलं तर मोदीजी यांची झोप उडाली आहे. मोदीजी यांचा चेहरा बदलला. मी एम्लीफायर आहे लोकांना सांगनं माझं काम आहे, तर लोकांचा आवाज ऐकणं काम आहे. काहीही करा जातीय जनगणना होणार आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा तोडणार. असेही राहुल गांधी म्हणाले.

हे ही वाच 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget