एक्स्प्लोर

Punjab Election 2022: मावळते मुख्यमंत्री चन्नी यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, आज राजीनामा देणार?

पंजाबचे मावळते मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मंत्रीमंडळाची महत्त्वाची  बैठक बोलावली आहे.  या बैठकीत चन्नी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

Punjab  Election 2022 : आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) पंजाबमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांपैकी 92 जागा जिंकत आपने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आता आम आदमी पार्टीचे सरकार येणार आहे. दिल्लीनंतर दुसऱ्या राज्यात आप सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, आज पंजाबचे मावळते मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Punjab Chief Minister Charanjit Singh Channi) यांनी मंत्रीमंडळाची महत्त्वाची  बैठक बोलावली आहे.  या बैठकीत चन्नी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसेच सर्व मंत्रीमंडळ देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, आज पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवान मान हे अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना शपथ ग्रहण करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहेत. शहीद भगतसिंह यांच्या गावामध्ये शपथविधीचा कार्यक्रम होणार असल्याचे भगवान मान यांनी सांगितले आहे.  खटकडकला हे भगतसिंह यांचे मुळ गाव आहे. त्याठिकाणी सर्व मंत्रीमंडळ शपथ ग्रहण करणार आहेत.
 
दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही आप पक्षाची जादू चालली असून, अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाने पंजाबच्या भूमीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने एकहाती विजय मिळवत 117 पैकी 92 जागांवर विजयी पताका फडकावली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजप तसेच अकाली दलाला मात दिली आहे. पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल अशा दिग्गजांना पराभव धक्का बसला आहे. 

पंजाब 

एकूण जागा : 117

आम आदमी पार्टी : 92
बहुजन समाज पक्ष : 1
भारतीय जनता पक्ष : 2
अपक्ष : 1
काँग्रेस : 18
शिरोमणी अकाली दल : 3

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget