Ashwani Kumar : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचा राजीनामा
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Ashwani Kumar resigns from Congress : येत्या 20 फेब्रुवारील पंजाबमध्ये विधानसभेसाठी (Punjab Assembly Election) मतदान होणार आहे. त्या मतदानाच्या पुर्वीच काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. निवडणुकांच्या आधीच अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
गेल्या दोन वर्षांत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह, सुष्मिता देव, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. मात्र, अश्विनी कुमार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जुने नेतेही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अश्विनी कुमार अन्य पक्षात जाणार की नाही याबाबतही काही स्पष्ट झालेले नाही. अश्विनी कुमार यांनीही अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार की, अन्य मार्ग निवडणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
अश्विनी कुमार 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 मध्येही अश्विनी कुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनीकुमार यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी कुमार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
पंजाबमध्ये तिकीट वाटपावरून काँग्रेस पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. अशातच पंजब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काँग्रसचे खासदार राहुल गांधी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिंधू नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.