गेल्या पाच वर्षात पंजाबमधील 'माफियाराज' संपला नाही; कॅप्टन अमरिंदर सिंह हेच 'माफिया, सिद्धू यांचा थेट आरोप
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर थेट आरोप केल आहे. त्यांनी अमरिंदर सिंह यांना माफिया असे म्हटले आहे.
Punjab Assembly Election 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय नेते ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. पंजाबमध्ये देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागच्या पाच वर्षामध्ये पंजाबमधील 'माफियाराज' संपला नाही कारण माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हेच माफिया होते असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी केलाय. त्यामुळे कॅप्टन यांना पदावरुन हटवले होते असा खुलासा यावेळी सिद्धू यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सिद्धू यांनी थेट माजी मुख्यमंत्री यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला आहे. त्यामुळे आणखी वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल देखील सिद्धू यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर सिद्धू म्हणाले की, याबाबत हायकमांड निर्णय घेईल. सिद्धूने पंजाबसाठी सर्वस्व पणाला लावले असल्याचे ते म्हणाले. यावेळी सिद्धू यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांच्यावर देखील आरोप केले. ते एका पिढीला बरबाद करणारा माणूस असल्याचे सिद्धू म्हणाले.
गेल्या पाच वर्षामध्ये पंजाबमधील गुंडगिरी कमी झाली नाही. कारण कॅप्टन अमरिंदर सिंह हेच गुंडगिरी करत होते. त्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवले असल्याचे सिद्धू म्हणाले. माझ्या 17 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एकही अशा पद्धतीचे आरोप झाले नाहीत. काँग्रेस हा खूप हुशार आणि समजदार पक्ष आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्मय घेईल तो विचारपूर्वक आणि योग्यच असेल असे सिद्धू यांनी यावेळी सांगितले. हायकमांड जो नर्णय घेईल तो मला मान्य असेल असे त्यांनी सांगितेल.
महत्त्वाच्या बातम्या: