एक्स्प्लोर

Pune Lok Sabha Result 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

Pune Lok Sabha Election Result 2024 :  पुण्यात तीन प्रमुख उमेदवार जरी रिंगणात असले तरी खरी लढत ही रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच असल्याचं दिसतंय. 

Pune Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे. 

राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितकडून वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभेच्या रिंगणात होते. 

पुणे लोकसभा निवडणूक विजयी उमेदवार

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
रवींद्र धंगेकर काँग्रेस  
मुरलीधर मोहोळ भाजप मुरलीधर मोहोळ
वसंत मोरे बहुजन विकास आघाडी  

 

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासोबत मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली. 

पुणे 2019 सालचा निकाल -

गिरीश बापट - भाजप - 6,32,835
मोहन जोशी - काँग्रेस - 3,08,207 
वंचित - अनिल जाधव - 64,793 

विजयी उमेदवार - गिरीश बापट 

पुण्यात किती टक्के मतदान झालं? 

पुणे लोकसभा मतदानाची टक्केवारी 53.54 - टक्के

  • वडगाव शेरी - 51.71  टक्के
  • शिवाजीनगर - 50.67  टक्के
  • कोथरूड - 52.43 टक्के
  • पर्वती - 55.47 टक्के
  • पुणे कॅन्टोन्मेंट - 53.13 टक्के
  • कसबा पेठ - 59.24 टक्के

पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात 20,61,276 मतदारांपैकी 11,03,678 पुणेकरांनी मतदान केलं आहे. त्यात 10,57,877 पुरुष मतदारांपैकी 5,84,511 म्हणजेच 55.25 टक्के एकूण पुरुषांनी मतदान केलं आहे. तर 10,03,075 महिला मतदारांपैकी 5,19,078  म्हणजेच एकूण महिलांपैकी 51.75 टक्के महिलांनी मतदान केलं आहे. इतर मतदारांपैकी (तृतीयपंथी) 324 पैकी 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

विधानसभानिहाय आमदारांची यादी

  • वडगाव शेरी - सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) 
  • शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
  • कोथरूड - चंद्रकांत पाटील (भाजप)
  • पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप)
  • पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप)
  • कसबा पेठ - रवींद्र धंगेकर (काँग्रेस) 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget